Mumbai Rain Update: मुंबई, ठाणे, परिसरात पावसाने पुन्हा कमबॅक केले आहे. हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून सकाळपासून मुंबईच्या अंधेरी, विरार, भाईंदर, ठाणे, मुलुंड, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे लोकलसेवेवर देखील परिणाम झाला असून काही गाड्या या विलंबाने धावत आहेत.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतली होती. शहरात उकाडा वाढला होता. त्यामुळे नागरिक पावसाचा प्रतीक्षेत होते. मुंबई आणि परिसरात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला हे. शुक्रवारी मुंबईत काही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. मात्र, आज शनिवारी पहाटे पासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहेआहे.
मुंबई व उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत असून या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला आहे. यात अंधेरी, विरार, भाईंदर, ठाणे, मुलुंड, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ व नवी मुंबई मुसळधार पाऊस सुरू असून काही भागात पाणी सचल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवेवर देखील परिमाण झाला आहे. त्यामुळे काही गाड्या या विलंबाने धावत आहेत. मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेचाही वेगही मंदावला आहे.
मुंबई ठाण्यात मध्यरात्री पासून पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे मुंबई व ठाण्यातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह, पुणे, सातारा व विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात देखील जोरदर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात देखील पासवाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात मध्यरात्री काही भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सखल भगात पाणी साचले होते. मात्र, सकाळपासून पावसाने विश्रांती घेलती आहे. पुण्यासह सातारा जिल्ह्यात देखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.