Mumbai Rain: 'मुंबईकर ऑफिसला कसे जात आहेत?' सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, हसून हसून पोट दुखेल!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rain: 'मुंबईकर ऑफिसला कसे जात आहेत?' सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, हसून हसून पोट दुखेल!

Mumbai Rain: 'मुंबईकर ऑफिसला कसे जात आहेत?' सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, हसून हसून पोट दुखेल!

Updated Jul 08, 2024 01:17 PM IST

Mumbai Rain Viral Memes: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

मुंबईकरांना पावसानं झोडपलं, नागरिकांचे हाल!
मुंबईकरांना पावसानं झोडपलं, नागरिकांचे हाल!

Mumbai Rain Updates: मुंबईत सोमवारी मध्यरात्री एक ते सकाळी सात वाजेपर्यंत ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. अनेक भागात पाणी साचले आहे, तसेच वाहतूककोंडी झाली असून लोकलसेवा देखील ठप्प झाली. शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून सोशल मीडियावर पावसासंदर्भात मीम्स व्हायरल होत आहेत.

मुंबईसह कल्याण ते कसारा परिसरात तुफान पाऊस सुरू असल्याने रविवारी याचा मध्य रेल्वेवर या पावसाचा मोठा परिणाम दिसून आला. परिणामी, प्रवाशांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असताना सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे. मुसळधार पावसात मुंबईकर ऑफिसला कसे जात आहेत? अशा प्रकारचे हे मीम्स आहेत. हे मीम्स पाहून अनेकांना हसू आवरता येईना.

मुंबईत अवघ्या सहा तासांत ३०० मिलिमीटर पावसाची नोंद

मुंबई सोमवारी मध्यरात्री १.०० ते सकाळी ७.०० या वेळत मुंबईत विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या कालवधीत ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि खाजगी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले.

बेस्ट बसेसच्या वाहतुकीत बदल

मुंबईत पावसामुळे पाणी साचल्याने बेस्टच्या अनेक बसेस नियमित मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. मुंबईत पावसामुळे किंग्ज सर्कल येथे पादचारी आणि वाहने मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले रस्ते ओलांडताना दिसत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्लेजवळ वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

भारतीय हवामान खात्याचा इशारा

भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला सतत मुसळधार पाऊस आणि संभाव्य पुराचा इशारा दिला आहे. विक्रोळीच्या वीर सावरकर मार्ग महापालिका शाळा आणि पवई येथे गेल्या २४ तासांत ३१५ मिमीपेक्षा सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर