Mumbai Rain update : मुंबईत आज जोरदार बरसणार! हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट; भरती ओहोटीमुळे समुद्र किनाऱ्यापासून दूर राहा-mumbai rains imd issues orange alert for very heavy rains in the city ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rain update : मुंबईत आज जोरदार बरसणार! हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट; भरती ओहोटीमुळे समुद्र किनाऱ्यापासून दूर राहा

Mumbai Rain update : मुंबईत आज जोरदार बरसणार! हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट; भरती ओहोटीमुळे समुद्र किनाऱ्यापासून दूर राहा

Aug 04, 2024 10:38 AM IST

Mumbai Rain update : आयएमडी मुंबईने आज शहरात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबईत आज जोरदार बरसणार! हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट; भरती ओहोटीमुळे समुद्र किनाऱ्यापासून दूर राहा
मुंबईत आज जोरदार बरसणार! हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट; भरती ओहोटीमुळे समुद्र किनाऱ्यापासून दूर राहा

Mumbai Rain update : राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने आज मुंबईसह, कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने मुंबईत आज अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर शहर आणि उपनगरात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. समुद्रात उंच लाटा उसळणार असून भरती आणि ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहंन मुंबई महानगर पालिकेने केले आहे.

राज्यात आज हवामान विभागाने मुंबईसह ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व नाशिकसह महाराष्ट्रातील इतर चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने रेड अलर्ट जारी केला आहे.

पालघरमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे आणि साताऱ्यात घाट भागात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार तर मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक्सवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, शहरात अधूनमधून ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून ताशी ६५ किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अधूनमधून ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहतात. समुद्रात पुढील काही तासांत भरती दरम्यान  दुपारी १२:२३ वाजता - ४.३५ मीटर तर रात्री- ००:१५ वाजता - ३.७९ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तर ओहोटी दरम्यान सायंकाळी ०६:२७ वाजता - १.५६ मीटर तर उद्या पाच तारखेला पहाटे ०६:०८ वाजता  ०.७५ मीटर ऊंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने समुद्रापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत मलेरिया आणि एच१एन१ (फ्लू) रुग्णांमध्ये वाढ

गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत जुलै २०२४ मध्ये मलेरिया आणि एच१एन१ (फ्लू) रुग्णांमध्ये अनुक्रमे ७९७ आणि १६१ रुग्णांची वाढ झाली आहे. जुलै २०२३ च्या तुलनेत या वर्षी डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिसच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. परंतु मलेरिया आणि एच 1 एन 1 (फ्लू) संसर्गात वाढ झाली आहे. या, बाबतची माहिती बीएमसीने त्यांच्या अहवालात दिली आहे. जुलै २०२४ मध्ये मुंबईत मलेरियाचे ७९७ आणि एच१एन१ चे १६१ रुग्ण आढळले, तर गेल्या वर्षी याच महिन्यात अनुक्रमे ७२१ आणि १०६ रुग्ण आढळले होते.