Mumbai Rain : मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी; मुंबई महापालिकेची घोषणा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rain : मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी; मुंबई महापालिकेची घोषणा

Mumbai Rain : मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी; मुंबई महापालिकेची घोषणा

Jul 25, 2024 05:51 PM IST

Mumbai Schools, Colleges Closed Tomorrow: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जवजीवन विस्कळीत झाले. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुबंई महापालिकेने केले आहे.

मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

Mumbai Rain Updates: मुंबईत रात्रभर झालेल्या पावसामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा, विमान सेवा आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांची गैरसोय झाली असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. याचपार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या (२६ जुलै २०२४) सुट्टी जाहीर केली. शाळांनी पालकांना कळवावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मुंबई महापालिकेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात शाळा आणि शिक्षकांनी पालकांच्या प्रतिनिधींना कळवावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच आवश्यक ती खबरदारी घेऊन शालेय स्तरावर योग्य समन्वयाची खात्री करावी.

मुंबईतील अनेक भागात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस

गुरुवारी पहाटे चार ते दुपारी एक या वेळेत मुंबईतील अनेक भागात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. अंधेरीतील मालपा डोंगरी भागात या काळात सर्वाधिक १५७ मिमी, पवईतील पासपोली येथे १५५ मिमी आणि दिंडोशी येथे १५४ मिमी पावसाची नोंद झाली.

ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

आयएमडीने मुंबई आणि आसपासच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही भागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील कोकणात आयएमडीने रत्नागिरी जिल्ह्यासाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी गुरुवारसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

राज्यभरात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि पुण्यातील पूरसदृश्य परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मी सकाळपासून संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना जेवणाची पाकिटे आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मी जिल्हाधिकारी, दोन निरीक्षक आणि एनडीआरएफला कळवले होते. गरज पडल्यास लोकांना एअरलिफ्ट करण्यासही मी लष्कराला सांगितले होते. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. बचावकार्य सुरू आहे.’

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर