Mumbai Rain : मुंबईला पावसाने झोडपले! वाहतुकीवर परिमाण; अनेक ठिकाणी साचले पाणी; समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rain : मुंबईला पावसाने झोडपले! वाहतुकीवर परिमाण; अनेक ठिकाणी साचले पाणी; समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन

Mumbai Rain : मुंबईला पावसाने झोडपले! वाहतुकीवर परिमाण; अनेक ठिकाणी साचले पाणी; समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन

Updated Jul 21, 2024 05:17 PM IST

Mumbai Rain news update : मुंबईत शनिवार पासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज देखील पावसाने सकाळ पासून जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचले असून वाहतुकीवर परिमाण झाला आहे. पोलिसांनी महत्वाची सूचना मुंबईकरांसाठी जारी केली आहे.

मुंबईला पावसाने झोडपले! वाहतुकीवर परिमाण; अनेक ठिकाणी साचले पाणी; समुद्रकिनाऱ्या पासून दूर राहण्याचे आवाहन
मुंबईला पावसाने झोडपले! वाहतुकीवर परिमाण; अनेक ठिकाणी साचले पाणी; समुद्रकिनाऱ्या पासून दूर राहण्याचे आवाहन

Mumbai Rain news update : मुंबईत शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज रविवारी मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. यामुळे मुंबईत काही भागात वाहतूक कोंडी झाली होती. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याने मुंबई पोलिसांनी सर्व नागरिकांना खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी समुद्राजवळ तसेच किनारपट्टीभागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पाडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत १०० डायल करून मदत घ्या असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.

मुंबईत शनिवार पासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईवर परिमाण झाला आहे. मुंबईतील वाहतूक संथ गतीने पुढे सुरू आहे. अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. सकाळ पासून सुरू असलेल्या पावसाचा परिमाण विमान सेवेवर देखील झाला आहे. आज मुंबई विमानतळावर खराब हवामानामुळे अमृतसरहून मुंबईला जाणारी विस्ताराचे विमान अहमदाबादकडे वळविण्यात आले. तर अमृतसरहून मुंबईला जाणारे यूके ६९६ (एटीक्यू-बीओएम) हे विमान मुंबई विमानतळावर खराब हवामानामुळे अहमदाबादकडे वळविण्यात आले आहे. हे विमान दुपारी १२.१५ वाजता अहमदाबादला (एएमडी) पोहोचण्याची शक्यता आहे, असे विस्तारा एअरलाइन्सने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

मुंबईत गेल्या आठवडाभर मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील प्रादेशिक हवामान केंद्राने यलो अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट २४ जुलैपर्यंत कायम राहणार आहे. रविवारी मुंबईचे कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस ते २५ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात पाणी साचले आहे. शहरातील अनेक भुयारी मार्ग पाण्याखाली गेले आहेत. सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली असून सकाळी पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

मुंबईतील रहिवासी भागात विशेषत: दादर, वरळी, परळ, माटुंगा, माहीम आणि प्रभादेवी येथे शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सखल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबईच्या उपनगरात देखील पावसाचा जोर कायम आहे. मुंबई लोकल पावसामुळे उशिराने धावत आहेत. दादर, परळ या भागांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे, परळ भागात असलेल्या वाडिया आणि के.ई.एम.रुग्णालयाच्या परिसरात एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचले आहे. या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीला फटका बसला आहे.

पोलिसांनी केले आवाहन

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबई पोलिसांनी सतर्क राहण्याचे ट्विट करत महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. समुद्रकिनारी जाऊ नये, गरज असेल तरच घराबाहेर पडा. कृपया काळजी घ्या, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. मुंबईत गेल्या ३ दिवसांत ३२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

अनेक रस्ते गेले पाण्याखाली

मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे विलेपार्ले, पश्चिम परिसरात दादाभाई रोड व एस.व्ही रोड पाण्याखाली गेला आहे. येथीकल कॅप्टन गोरे उड्डाणपूला खाली पाणी साचले आहे. पश्चिम परिसरात दादाभाई रोड रस्ता पाण्याखाली गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

पावसामुळे येथील बस मार्ग देखील बदलण्यात आले आहे. बसमार्ग क्र. ३६३ व ४३० रेल्वे ब्रिज पाणी खली गेल्याने या मार्गाने जाणाऱ्या बस या वळवण्यात आल्या आहेत. तर बसमार्ग क्र.३६० सेल कॉलनी येथे पाणी भरल्यामुळे देखील येथील बस या चेंबूर नाका येथून डावे वळण घेऊन बसमार्ग वळवण्यात आल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर