मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Two Drown in Mithi River : माहीम दर्ग्यात दर्शनासाठी आलेले दोन तरुण मिठी नदीत बुडाले

Two Drown in Mithi River : माहीम दर्ग्यात दर्शनासाठी आलेले दोन तरुण मिठी नदीत बुडाले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 12, 2022 09:54 AM IST

Mumbai Updates : मुंबईत माहीम येथील दर्शनासाठी आलेले दोन तरुण खाडीवर उभे असतांना एकाच पाय घसरून तो मिठी नदीत पडल्याने त्याच्या मृत्यू झाला. तर दूसरा त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात नदीत उतरल्याने तो बेपत्ता झाला.

माहीम येथे खाडीत पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला.
माहीम येथे खाडीत पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला.

मुंबई : माहीम येथील दर्ग्यात दर्शन घेण्यासाठी आलेले दोन तरूणांना नदीतील खडकावर उभे राहणे अंगलट आले आहे. एकाचा पाय घसरून तो नदीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. तर दूसरा तरुण त्याला वाचवण्यासाठी नदीत उतरल्याने तोही बेपता झाला आहे. ही घटना मध्यरात्री घडली. बचाव पथक दोघांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी पोहचले. मात्र, भरती असल्याने त्यांचा शोध घेता आला नाही. आज सकाळी पाणी ओसारल्यावर एकाच मृतदेह हा किनाऱ्याजवळ आढळून आला आहे. अग्निशामक दलातर्फे दुसऱ्याच शोध सुरू आहे.

जावेद आणि आसिफ अशी वाहून गेलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही तरुण कुर्ला येथील आहेत. ते गुरुवारी माहीम दर्ग्यात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यावर दोघेही जवळच असलेल्या माहिमच्या खाडीवर गेले. मध्यरात्री घरी जात असताना ते खाडीपाशी गेले. त्यावेळी दोघांपैकी एकाचा पाय घसरला आणि तो खाडीत पडला. यावेळी त्याच्या दूसरा मित्र त्याला वाचवण्यासाठी त्याला वाचवण्यासाठी खाडीत उतरला. मात्र, तोही बुडला.

ही माहिती स्थानिकांना कळल्यावर त्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी शोध कार्य सुरू केले. मात्र, पाऊस जास्त असल्याने आणि त्यात भरती असल्याने मध्यरात्री शोधकार्य थांबवण्यात आले. सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले. पहाटे पाणी ओसरलयावर एकाचा मृतदेह हा किनाऱ्यालगत आढळला. तर दुसऱ्या मित्राचा शोध अद्याप सुरुच आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरु आहे.

WhatsApp channel

विभाग