Mumbai rain update : मुंबईत रविवारी आणि सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे रेल्वे सेवेवर देखील परिमाण झाला होता. दरम्यान, यानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. मात्र, काल मध्यरात्री पासून मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. दादर, सायन माटुंगा, वडाळा भागाच संततधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरात पुढील दोन ते तीन तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर व कोकणात देखील मुळसाधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईत दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. रविवारी आणि सोमवारी मुंबईत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. पासवामुळे मुंबईची लोकल सेवा ही विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साठल्याने हे अनेक लोकल या रद्द करण्यात आल्या होत्या. तर दोन्ही सत्रातील शाळांना देखील सुट्टी जाहिर करण्यात आली होती. यानंतर हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. मात्र, पावसाने हुलकावनी देत विश्रांती घेतली होती. मंगळवार पासून मुंबईत उन आणि ढगाळ हवामान होते. मात्र, या मुंबईत पावसाने पुनरागमन केले आहे.
मुंबईत मध्यरात्री पासून पाऊस सुरू झाला आहे. मुंबई आणि उपनगर भागात पावसाने हजेरी लावली आहे. दादर, सायन, माटुंगा भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. तर उपनगर भागात देखील पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसाठी खास इशारा दिला आहे. मुंबईत पुढील तीन चार तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आज यलो अलर्ट तर उद्या १३ जुलै रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर १४ आणि १५ तरखेसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. १५ तारखेंनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे.
कोकणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. येथील नद्यांना पुर आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर १५ तारखेनंतर पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या