Mumbai rain update : राज्यातील अनेक जिल्ह्यांसह आज मुंबई व उपनगरात वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसाने हाहाकार उडाला आहे. मुंबई उपनगरातील विक्रोळी, भांडूप, धारावी आणि मुलुंडूमध्ये मोठा पाऊस पडत असून असून पावसापूर्वी धुळीचे वादळ आल्याने अनेक घरात धूळ पसरली. जोरदार वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने लोकलसह रस्ते वाहतूकही मंदावली आहे. दरम्यान अनेक ठिकाणांहून नुकसानीच्या घटना समोर आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमध्ये इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळील छेडानगर सेक्टर ३ येथे पेट्रोल पंपावर अचानक होर्डिंग कोसळल्याने (hoarding collapsed on petrol pump) पावसापासून बचावासाठी थांबलेले अनेक वाहनचालक त्याखाली अडकले. घाटकोपर पूर्वच्या पंतनगरमधील पोलीस ग्राऊंडजवळ हा पेट्रोल पंप आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. भलंमोठं होर्डिंग कोसळल्यामुळे पेट्रोल पंपाच्या छताचे मोठे नुकसान झालेअसून त्याखाली जवळपास १०० ते १५० जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर या घटनेत जखमी झालेल्या ३५ जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ६२ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर ६० जण जखमी आहेत. या दुर्घटनेत ३ जण ठार झाले आहेत. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ही घटना दुर्भाग्यपूर्ण आहे. घाटकोपरच्या घटनेला जबाबदार असणाऱ्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार, असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
जोरदार वाऱ्यामुळे वडाळा बरकत अली नगर येथे कार पार्किंग लिफ्ट कोसळली (parkinglift collapses) आहे. ही घटना बरकत अली नगरमधील गोडाऊनच्या समोर श्रीजी टॉवरजवळ घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पार्किंग टॉवर खालून जाणाऱ्या वाहनांवर ही पार्कींग लिस्ट कोसळली आहे. लिफ्ट कोसळलेल्या या वाहनांमध्ये काही लोक अडकल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बचाव कार्य सुरु केले. ही लिफ्ट ८ ते १० वाहनांवर कोसळली. त्यातील एका वाहनात एकजण अडकला असून मदत व बचावकार्य सुरू आहे.
उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना आज अवकाळी पावसाने दिलासा दिला मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडाली. जोरदार बरसलेल्या पावसाने मेट्रो आणि लोकलसेवा ठप्प झाली. तर रस्त्यावर अनेक ठिकाणी ट्राफिक जाम झाले. ओव्हरहेड वायरवर बॅनर कोसळल्यामुळे वर्सोवा घाटकोपर मेट्रो सेवा ठप्प झाली होती. ती आता सुरळीत झाली आहे. मात्र मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते ठाणे दरम्यान ओव्हरहेड खांब कोसळल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक स्टेशन्सवर लोकांची गर्दी झाली आहे. लोकलचा खोळंबा झाल्यानं अनेकजण रस्तेमार्गाने जात असून यामुळे अनेक ठिकाणी ट्राफिक जाम झालंय. वेस्टन एक्स्प्रेस हायवेवर लाबंच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
संबंधित बातम्या