Mumbai rain : नवी मुंबई, ठाण्याला मुसळधार पावसाचा फटका! लोकलसेवा विस्कळीत; कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai rain : नवी मुंबई, ठाण्याला मुसळधार पावसाचा फटका! लोकलसेवा विस्कळीत; कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प

Mumbai rain : नवी मुंबई, ठाण्याला मुसळधार पावसाचा फटका! लोकलसेवा विस्कळीत; कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प

Jul 07, 2024 01:46 PM IST

Rain Updates Konkan Railway : नवी मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले असून नद्यांना ओढ्यांना पुर आला आहे. पावसामुळे रेल्वे सेवा देखील ठप्प झाली आहे.

मुंबईला मुसळधार पावसाचा फटका! लोकलसेवा विस्कळीत; कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प
मुंबईला मुसळधार पावसाचा फटका! लोकलसेवा विस्कळीत; कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प

Rain Updates Konkan Railway : नवी मुंबई, ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागात पाणी घुसले आहे. ठाण्यातील भारंगी नदीवर अचानक पाणी वाढल्याने अनेक वाहने वाहून गेली आहेत. सखल भागात देखील पाणी घुसल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे असे आवाहन केले आहे. या पावसामुळे कल्याण कासारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तर आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने व काही ठिकाणी रेल्वे रुळावर माती आल्याने या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

नवी मुंबईत, ठाणे परिसरात शनिवार रात्री पासून जोरादर पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. आटगाव रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी झाडे कोसळल्याने व रुळावर माती आल्याने या मार्गावरची लोकलसेवा ही ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे वासिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरचा पोल खचला आहे. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे वासिंद-कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूकीवर देखील परिमाण झाला आहे. आज पहाटे ६ पासून कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे विस्कळीत झाली आहे. या मार्गावरची लोकल सेवा पुरवत करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या पावसामुळे रखडून पडल्या आहेत. मुंबईकडे येणारी मेंगलोर एक्सप्रेस देखील पावसामुळे रखडली आहे. कसाऱ्यावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणाऱ्या अप साईडच्या गाड्या देखील विस्कळीत झाल्या आहेत. काही गाड्या या ट्रॅकवरच उभ्या आहेत. त्यामुळे काही गाड्या या वसई दिवा मार्गे वळवण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईत मुसळधार पाऊस-

नवी मुंबईसह पनवेलमध्ये देखील सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाचे पाणी आदई, सुकापूर येथील सखल भागात भरू लागले आहे. या परिसरातील अनेक घरात पाणी गेले आहे. बऱ्याच गाड्या या पाण्यात बुडाल्या आहेत. कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कळंबोली भागात पुराचा धोका वाढला आहे.

भारंगी नदीच्या पाण्यात वाहने गेली वाहून

शहापूरमधील गुजरातीबाग, चिंतामणनगर, ताडोबा परिसर आणि गुजरातीनगर या परिसरामध्ये भारंगी नदीचे पाणी घुसले आहे. या नदीच्या पाण्यात काही वाहने वाहून गेली आहेत. येथील काही घरात नागरिकांच्या कमरे पर्यंत पाणी साचले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर