Mumbai Local Leakage : मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल ट्रेनला गळती; प्रवाशांचा रेनकोट घालून प्रवास; व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Leakage : मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल ट्रेनला गळती; प्रवाशांचा रेनकोट घालून प्रवास; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local Leakage : मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल ट्रेनला गळती; प्रवाशांचा रेनकोट घालून प्रवास; व्हिडिओ व्हायरल

Jul 14, 2024 12:36 PM IST

Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे मुंबई लोकलच्या डब्यामध्ये गळती लागल्याने प्रवाशांना चक्क रेनकोट घालून प्रवास करावा लागला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 मुसळधार पावसामुळे मुंबई लोकलच्या डब्यामध्ये गळती
मुसळधार पावसामुळे मुंबई लोकलच्या डब्यामध्ये गळती (HT_PRINT)

Mumbai Local Leak Viral Video: पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत आज सकाळी झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आणि वाहतूक कोंडी झाली. याच पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात प्रवाशी चक्क रेनकोट घालून प्रवास करताना दिसत आहे.

मुंबई लोकलला मुंबईची लाइफ-लाइन म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल उशीराने धावत आहेत. तर, काही लोकल रद्द करण्यात आली.यातच मुंबई लोकलमधील गळतीचा व्हिडिओ समोर आल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. रेल्वे प्रशासनाला प्रवाशांची काळजी नाही का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडिओ कसारा- सीएमएमटी लोकलमधील आहे. ही लोकल सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी कसऱ्याहून सीएसएसटीकडे रवाना होते. परंतु, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे? हे अद्याप समजू शकलेले नाही.

मुंबईत लोकलच्या रेल्वे ट्रॅकवर मासे पोहोतानाचा व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मुंबई लोकल संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात रुळावर साचलेल्या पाण्यामध्ये मासे पोहोताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठल्या रेल्वे स्थानकावरील आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या

मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाली. भारतीय हवामान खात्याने १६ जुलैपर्यंत आकाश ढगाळ आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या कालावधीत तारखेदरम्यान मध्य महाराष्ट्रातील घाट भागात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोवा विभागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारी कुलाबा येथे ३ तासांत ८६ मिमी तर सांताक्रूझ येथे ११५ मिमी पावसाची नोंद झाली.

पावसामुळे मोठे नुकसान

राज्यात सोमवारपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसामुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली. मराठवाड्यात गेल्या ३९ दिवसांत जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला, यात पाण्यात वाहून जाणे, वीज पडून मृत्यू होण्याच्या घटनांचा समावेश आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर