Mumbai Rain: मुंबईला पावसानं झोडपलं! अनेक भागात साचले पाणी, रस्त्यांना तळ्याचं रूप; IMD नं दिला जोरदार पावसाचा इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rain: मुंबईला पावसानं झोडपलं! अनेक भागात साचले पाणी, रस्त्यांना तळ्याचं रूप; IMD नं दिला जोरदार पावसाचा इशारा

Mumbai Rain: मुंबईला पावसानं झोडपलं! अनेक भागात साचले पाणी, रस्त्यांना तळ्याचं रूप; IMD नं दिला जोरदार पावसाचा इशारा

Jul 08, 2024 08:20 AM IST

Heavy Rain in Mumbai: मुंबईत रविवार पासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज सोमवारी सकाळपासून देखील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे.

मुंबईला पावसानं झोडपलं! अनेक भागात साचले पाणी, रस्त्यांना तळ्याचं रूप; IMD नं दिला जोरदार पावसाचा इशारा
मुंबईला पावसानं झोडपलं! अनेक भागात साचले पाणी, रस्त्यांना तळ्याचं रूप; IMD नं दिला जोरदार पावसाचा इशारा (HT PHOTO)

Heavy Rain in Mumbai : मुंबईत शनिवारी रात्री पासून पावसाने जोरदार हजरे लावली आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे मुंबई शहर, उपनगर व ठाणे परिसरात अनेक भागात पाणी साचले आहे. तर आज सोमवारी पहाटेपासून देखील पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची त्रेधा उडाली आहे. मुंबई शहर व उपनगर परिरसरात सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नेहमीच्या परंपरेप्रमाणे पाणी साचले आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांनपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका लोकल आणि रेल्वेला बसला आहे. दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. तर उपनगरात असल्फा, साकीनाका, जेबी नगर, विक्रोळी, घाटकोपर, चकाला, अंधेरी येथे देखील पाणी साचाले आहे. पावसामुळे वाहतुकीचा वेग देखील मंदावला आहे. यामुळे मुंबईत सकाळपासून आखी रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मुंबई ठाण्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. ठाण्यात देखील आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामान विभागाने दिलेली माहितीनुसार, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात पुढील ३ दिवस १० जुलैपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. पावसामुळे कल्याण-कसारा विभागातील खडवली ते टिटवाळा दरम्यान रविवारी अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आणि लोकल सेवा विस्कळीत झाली. शहरातही रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार आज सोमवारी, ८ जुलै रोजी दिवसभर मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहणार असून रात्री मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

रविवारी गारपीट आणि पावसामुळे रुळांवर झाड कोसळल्याने कसारा ते टिटवाळा स्थानकांदरम्यानलोकल सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान, रविवारी आटगाव ते ठाणसित स्थानकांदरम्यान रुळांवर माती आली आणि रुळांवर झाड कोसळल्याने वाशिंद स्थानक ठप्प झाले आणि अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. सोमवारपासून या मार्गांवरील रेल्वे सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यात जोरदार पाऊस

महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेवर परिणाम झाला आहे. सोमवारी सकाळी रेल्वे स्थानक आणि रुळांवर पाणी साचले. सीआरपीओने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सायन आणि भांडुप आणि नाहूर स्थानकांदरम्यान रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पावसाचे पाणी रुळाच्या वर होते. त्यामुळे सुमारे एक तास गाड्या थांबवण्यात आल्या होत्या, आता पाणी थोडे कमी झाले आहे त्यामुळे गाड्या पुन्हा सुरू होत आहेत पण लोकल सेवा अजूनही प्रभावित आहे.

दिंडोशीत सकाळ पासून जोरदार पाऊस

मुंबईच्या दिंडोशीमध्ये सोमवारी पहाटे मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागात पाणी साचले आहे, अशी माहिती स्थानिक हवामान खात्याने दिली आहे. येत्या तीन-चार दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ८ जुलै ते १० जुलै २०२४ या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सोशल मिडीयावर मुंबईच्या पावसाचे अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांनी केले शेअर

पावसाचा जोर कायम असताना मुंबईतील नेटकऱ्यांनी उत्तर आणि दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचलेले आणि वादळी पावसाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर केले आहेत. यात पावसाची भीषणता दिसून येत आहे. १ तासात ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण मुंबईत विजांच्या कडकडाटासह विजांच्या कडकडाटासह सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे, सुदैवाने मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला," असं एका युजरने एक्सवर लिहिलं आहे.

पावसाळ्यात, विशेषत: जुलैमध्ये मुंबईत विजांच्या कडकडाटासह गारपीट होणे अत्यंत असामान्य असल्याचे ट्विटर वापरकर्त्यांने म्हटले आहे. तर याचा सर्वाधिक फटका ठाण्याला बसला असून, शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहापूर परिसरातील घरे आणि पूल पाण्याखाली गेले असून पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफने बचावकार्य सुरू केले आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर