Mumbai: आजीसमोर नातीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श, तरुणाला अटक; मुंबई- चेन्नई एक्स्प्रेसमधील घटना-mumbai railway police arrest 22 year old llb student for allegedly harassing minor girl on csmt chennai express ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: आजीसमोर नातीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श, तरुणाला अटक; मुंबई- चेन्नई एक्स्प्रेसमधील घटना

Mumbai: आजीसमोर नातीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श, तरुणाला अटक; मुंबई- चेन्नई एक्स्प्रेसमधील घटना

Sep 24, 2024 12:42 PM IST

LLB Student Allegedly Harassing Minor Girl: धावत्या ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एएलबीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

आजीसमोर नातीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श
आजीसमोर नातीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श

CSMT-Chennai Express News: महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात असताना मुंबईहून चेन्नईला निघालेल्या धावत्या ट्रेनमध्ये १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली. आजीसोबत प्रवास करणाऱ्या पीडिताला आरोपीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यानंतर पीडिताच्या आजीने तिकीट तपासनीस याबाबत माहिती दिली, ज्याने तत्काळ पोलिसांना सूचित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आजीसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून चेन्नईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले. त्यावेळी ट्रेनच्या दरवाजामध्ये उभा असलेल्या आरोपीने पीडिताला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले. परंतु, त्यावेळी पीडिताने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर पुन्हा आरोपीने तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला असता पीडिताने याबाबत आपल्या आजीला सांगितले. पीडिताच्या आजीने त्याला जाब विचारत तिकीट तपासनीसला याबाबत माहिती दिली. त्याने त्वरीत पोलिसांना सूचित केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन धावत्या ट्रेनमध्ये पीडिताचा जाब नोंदवून घेतला. त्यानंतर आरोपीला कर्जत स्थानकात उतरून सीएसएमटी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. एलएलबीचे शिक्षण घेत असलेल्या आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.

मुंबई: घरात घुसून महिलेवर बलात्कार

काही दिवसांपूर्वी मुंबईतील मिरा भाईंदरमध्ये एका महिलेवर घरात घुसून अत्याचार करण्यात आला. ही शनिवारी (१४ सप्टेंबर २०१४) रोजी घडली. पीडित महिला घरात एकटीच असताना आरोपी तिच्या घरात घुसला. त्यानंतर आरोपीने तिचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर त्याने दरवाजा बंद करून महिलेसमोरच दारू प्यायला सुरुवात केली. दारू प्यायल्यानंतर त्याने पुन्हा महिलेवर बलात्कार केला. महिलेने वॉशरुमला जाण्याचा बहाण्याने आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर तिने मदतीसाठी शेजारी राहणाऱ्या घरमालकाकडे धाव घेतली. पंरतु, घरमालक घरात नसल्याने पीडितेने रस्त्यावर येऊन आरडाओरड केली. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबई: महिला कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

नवी मुंबईत एका ४१ वर्षीय बँक कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पनवेल पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार आरोपीला अटक केली.

Whats_app_banner
विभाग