मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Megablock : मुंबईसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेसह पश्चिम आणि ट्रान्स हार्बर लाईनवर १४ तासांचा मेगाब्लॉक

Mumbai Megablock : मुंबईसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेसह पश्चिम आणि ट्रान्स हार्बर लाईनवर १४ तासांचा मेगाब्लॉक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 04, 2023 09:53 AM IST

Mumbai Megablock : मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. आज विवारी घराबाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर ते टाळा कारण मध्य रेल्वेसह पश्चिम आणि ट्रान्स हार्बर लाईनवर १४ तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. अनेक लोकलगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही लोकल रद्द तर काही विलंबाने धावणार आहे.

Mumbai Local Megablock
Mumbai Local Megablock (HT)

मुंबई : मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. आज रविवारी घराबाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर ते टाळा कारण मध्य रेल्वेसह पश्चिम आणि ट्रान्स हार्बर आज १४ तासांचा ब्लॉक घोषित असून यामुळे अनेक लोकलगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या सोबतच या ब्लॉकमुळे काही लोकल या उशिरा धावणार आहे.

Nanded Murder : नांदेड हादरले ! लग्नाच्या वरातीत गेल्यामुळे दलित तरुणाची हत्या; वंचितची कारवाईची मागणी

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जोगेश्वरी ते गोरेगावदरम्यान पुलाच्या गर्डरसंबंधी काम करण्यात येणार असल्याने हा मेगा ब्लॉक पश्चिम रेल्वेने घोषित केला आहे. या दरम्यान १४ तास रेल्वेची सेवा ही विस्कळीत राहणार आहे. शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून हा ब्लॉक सुरू करण्यात आला असून आज रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत हा ब्लॉक कालावधी राहणार आहे. यामुळे हार्बर मार्गावरील सर्व लोकल वांद्रे ते गोरेगावदरम्यान अनेक लोकल या रद्द करण्यात आल्या आहेट. ब्लॉक काळात राम मंदिर स्थानकात लोकल उपलब्ध राहणार नाही. तसेच मेल-एक्स्प्रेस फेऱ्या १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

- शनिवारी रात्री ११.०६ गोरेगाव ते सीएसएमटी

- शनिवारी रात्री १०.५४ सीएसएमटी ते गोरेगाव

ब्लॉकमुळे असे राहणार वेळापत्रक

- अंधेरी ते गोरेगाव दरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

- राम मंदिर स्थानकात फलाट नसल्याने या स्थानकात जलद लोकल थांबणार नाही.

- मध्य रेल्वेवरील सर्व गोरेगाव हार्बर लोकल वांद्रेपर्यंत धावणार आहेत.

- चर्चगेट-बोरिवली मार्गावरील काही लोकल अंधेरी स्थानकात रद्द करण्यात येतील.

- दुपारी १२.५३ गोरेगाव-सीएसएमटी, दुपारी १.५२ सीएसएमटी-गोरेगाव लोकल रद्द राहणार आहेत.

- ब्लॉकवेळेत सर्व वांद्रे-गोरेगाव लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

- ब्लॉकवेळेत सर्व मेल-एक्स्प्रेस १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

 

दरम्यान, ठाणे ते कल्याण आणि ठाणे ते वाशी-नेरूळ मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी ते गोरेगावदरम्यान शनिवार आणि रविवारी मध्यरात्री ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)

स्थानक - ठाणे ते कल्याण

मार्ग – अप आणि डाऊन जलद

वेळ – सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०

ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे

स्थानक – ठाणे ते वाशी/नेरुळ

मार्ग – अप आणि डाऊन

वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

ब्लॉक वेळेत ठाणे ते वाशी / नेरुळ /पनवेल दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

IPL_Entry_Point