Shivneri Bus Atal Setu: एसटीची शिवनेरी आजपासून अटल सेतूवरून धावणार; तिकीट किती? वाचा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivneri Bus Atal Setu: एसटीची शिवनेरी आजपासून अटल सेतूवरून धावणार; तिकीट किती? वाचा

Shivneri Bus Atal Setu: एसटीची शिवनेरी आजपासून अटल सेतूवरून धावणार; तिकीट किती? वाचा

Feb 20, 2024 11:35 AM IST

Shivneri Bus Service Via Atal Setu: आजपासून अटल सेतूवरून एसटी महामंडळाची शिवनेरी बस धावणार असल्याने प्रवाशांचा बराच वेळ वाचणार आहे.

Shivneri Bus Service Via Atal Setu
Shivneri Bus Service Via Atal Setu

Mumbai-Pune Shivneri Bus Service: देशातील सर्वात लांब सागरी पूल अटल सेतूवरुन आजपासून एसटी महामंडळाची शिवनेरी बस धावणार आहेत. यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचणार आहे. या बस पुण्यावरून सकाळी ६.३० वाजता आणि स्वारगेटवरून सकाळी ७.०० वाजता मंत्रालयाच्या दिशेने धावतील. या बस पुण्यातून निघाल्यानंतर पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय आणि दादरला पोहोचतील. त्यानंतर मंत्रालय आणि दादर येथून रात्री ११ वाजता याच मार्गाने पुण्याच्या दिशेने धावतील.

एसटी महामंडळाच्या म्हणण्यानुसार, पुणे बसस्थानक ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर (ई-शिवनेरी) या बस सेवा धावतील. यामुळे मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जवळपास २५ टक्के वेळ वाचणार आहे. "अटल सेतू आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससाठी महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल, जे पुणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरांना मंत्रालय आणि दादर या गजबजलेल्या परिसरांशी जोडेल" असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, प्रवासी www.msrtc.gov.in आणि www.npublic.msrtcors.com या अधिकृत वेबसाइट्सद्वारे तिकीट बूक करू शकतात. याशिवाय, एसटी महामंडळाच्या मोबाईल अॅपवरून देखील तिकीट बूक करता येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, तिकीट दरामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. तरी प्रवाशांनी शिवनेरी बस सेवांचा लाभ घ्यावा, असे एसटी महामंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई-पुणे मार्गावर दररोज २१० शिवनेरी बस चालवल्या जात आहेत, ज्यांनी दोन शहरांमधील अंतर चार तासांत कापले आहे. अटल सेतूवरून धावणारी शिवसेरी बस दादर आणि कळंबोली दरम्यानच्या १४ बस स्थानकावर थांबणार नाही. प्रवाशांसाठी प्रवास सुलभ करण्याचे एसटी महामंडळाचे उद्दिष्ट आहे. अटल सेतूवरून बस सेवा सुरू केल्याने महाराष्ट्रातील परिवहन पायाभूत सुविधांच्या एकूण वाढीस हातभार लागण्याची अपेक्षा आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर