Pune Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; कोंबड्यांनी भरलेला टेम्पो ट्रकवर आदळून एक ठार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; कोंबड्यांनी भरलेला टेम्पो ट्रकवर आदळून एक ठार!

Pune Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; कोंबड्यांनी भरलेला टेम्पो ट्रकवर आदळून एक ठार!

Published Jul 20, 2024 09:56 AM IST

Mumbai Pune Highway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवर खालापूरजवळ कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोने साखर वाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली आहे.

Mumbai Pune Highway Accident
Mumbai Pune Highway Accident

Mumbai Pune Highway Accident: मुंबई-पुणे महामार्गावर सध्या अपघातांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात झाल्याच्या बातम्या ऐकवात येत असतानाच, आता मुंबई-पुणे एक्सप्रेसवर खालापूरजवळ कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोने साखर वाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, यातील एक जण गंभीर जखमी झाला आहे. या भीषण अपघातात दोन्ही वाहने जागीच जळून खाक झाली आहे. या अपघातातील एका व्यक्तीला एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबई पुणे महामार्गावरून अनेक अवजड वाहने प्रवास करत असतात. या दरम्यान अनेकदा त्यांच्या अपघाताच्या बातम्या कानावर येत असतात. खालापूरजवळ झालेल्या या अपघातातील एक ट्रक साखरेची पोती वाहून नेत होता. तर, कोंबड्यांनी भरलेला टेम्पो या ट्रकवर मागच्या बाजूने भरधाव वेगात आला आणि साखरेच्या ट्रकवर जोरात आदळला. या दोन वाहनांची ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पोच्या पुढील भागाचा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या जोरदार धडकेमुळे ट्रक आणि टेम्पोने लगेच पेट घेतला. त्यामुळे ट्रकचा मागील भाग आणि टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला. या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रक आणि टेम्पोच्या या अपघातात एक जण जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल पनवेल येथे दाखल केले आहे.

Local Train Update: मुसळधार पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत; मध्य आणि हार्बरसह पश्चिम रेल्वे देखील उशीरा!

मदतकार्यात आल्या अडचणी

ट्रक आणि टेम्पो, दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर कोंबड्यांच्या टेम्पोची पुढची बाजू पूर्णपणे चेंदामेंदा होऊन गेली. टेम्पो दबून गेल्यामुळे चालकाचा मृतदेह आतमध्येच अडकून पडला होता. तर, या अपघातात टेम्पोने देखील पेट घेतल्यामुळे त्यातील लोकांनाही बाहेर काढताना अनेक अडचणी आल्या. मदतकार्य करताना देखील अडचणींचा सामना करावा लागला.

अखेर या वाहनांनाची आग विझवल्यानंतर बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी टेम्पोचा पत्रा कापून चालकाला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या जोरदार धडकेमुळे टेम्पोमधील काही कोंबड्याही दगावल्या आहेत. काहीवेळापूर्वी हा टेम्पो रस्त्यावरून दूर करण्यात आला आहे. दुसरीकडे, या भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने, या अपघातात बचावकार्य करताना अनेक अडथळे येत होते. देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, फायर ब्रिगेड आणि हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर