मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मंगळवारी दोन तासांचा ब्लॉक; असा असेल पर्यायी मार्ग

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मंगळवारी दोन तासांचा ब्लॉक; असा असेल पर्यायी मार्ग

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 29, 2024 11:26 PM IST

Mumbai Pune Expressway Block : मुंबई– पुणेमहामार्गावर मंगळवारी दुपारी १२ ते २ वाजेच्या दरम्यानहा ब्ल़ॉक घेण्यात येणार आहे. महामार्गावरग्रँटी बसविण्याचे काम करण्यात येणार आहे.

Mumbai pune expressway (file pic)
Mumbai pune expressway (file pic)

तुम्ही जर मंगळवारी (३० जानेवारी) मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून (Mumbai - Pune Expressway) प्रवास करणार असाल तर ही बातमी अवश्य वाचा. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या (३० जानेवारी) दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबई– पुणे महामार्गावर मंगळवारी दुपारी १२ ते २ वाजेच्या दरम्यान हा ब्ल़ॉक घेण्यात येणार आहे. महामार्गावर ग्रँटी बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. महामार्गावरील या कामामुळे वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या वेळेत मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.

या कालावधीत पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने कि.मी. ५४.४०० येथून कुसगाव टोलनाका येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळवले आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीत अवजड वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

 

मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. परंतु मंगळवारी १२ ते २ या वेळेत महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

WhatsApp channel