Mumbai Pune Expressway traffic news : ख्रिसमसमुळे आणि सलग आलेल्या सुट्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या तब्बल १० किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. तसेच अनेक वाहने ही रस्त्यावरच बंद पडली होती. ही वाहतूक कोंडी सोडवतांना पोलिसांची दमछाक झाली होती. आता पुन्हा नवीन वर्षानिमित्त व सलग सुट्ट्या आल्यामुळे या मार्गवारील वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांनी अवजड वाहन चालकांना दुपारी १२ नंतर प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ख्रिसमसच्या वेळी देखील महामार्ग पोलिसांनी असे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाला अवजड वाहन चालकांनी हरताळ फासला होता. यामुळे जे व्हायचे तेच झाले. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल ३६ तासांनी ही कोंडी सोडवण्यात यश आले होते. आता पुन्हा नवीन वर्षानिमित्त आणि सलग सुट्ट्या आल्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुन्हा अवजड वाहन चलकांना सकाळी ते दुपारी १२ दरम्यान, या मार्गावरून प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र, या आवाहनामुळे पोलिसांवर टीका देखील होत आहे. ख्रिसमसच्या वेळेचा अनुभव असतांना देखील उपायोजना करण्याचे सोडून आवाहन करणे चुकीचे असल्याची टीका होत आहे. या मार्गवारील वाहतूक कोंडीवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी देखील प्रवाशांनी केली आहे. वाहतूक कोंडीबाबत महामार्ग पोलिसांच्या या भूमिकेमुळे प्रवाश्यांमधून देखील नेहमी नाराजीचा सूर उमटतो.
शनिवार (दि ३०) आणि रविवार (दि ३१) दोन दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे मुंबईचे मोठे नागरीक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोणावळ्यात येत असतात. त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी देखील होणार आहे. त्यामुळे घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबविले जाते. तर वाहतूक कोंडी दूर झाल्यावर जड अवजड वाहनांना पुन्हा पुढील प्रवासाठी सोडण्यात येते.
संबंधित बातम्या