Mumbai Pune Expressway accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघात! कंटनेर, गॅस टँकर आणि कारची एकमेकांना धडक; एक ठार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune Expressway accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघात! कंटनेर, गॅस टँकर आणि कारची एकमेकांना धडक; एक ठार

Mumbai Pune Expressway accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघात! कंटनेर, गॅस टँकर आणि कारची एकमेकांना धडक; एक ठार

Updated Jul 05, 2024 01:44 PM IST

Three vehicles collide on Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. या अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांमध्ये भीषण अपघात
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांमध्ये भीषण अपघात

Mumbai Pune Expressway Accident News: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आज (शुक्रवारी, ०५ जुलै २०२४) सकाळी भीषण अपघात झाला. खालापूर हद्दीतील बोगद्याजवळ कंटेनर, गॅस टँकर आणि कारने एकमेकांना धडक दिली. या धडकेत एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, काहीजण गंभीर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णलयात उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी सात वाजताच्या सुमारास तीन वाहने एकमेकांवर धडकले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. हा अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, काहीजण जखमी झाले आहेत. जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.अक्षय ढेले (वय, ३०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अक्षय हा लातूरच्या अहमदपूर येथील रहिवाशी आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर दोन कारची धडक

समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कडवंची गावाजवळ शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती मुंबईतील मालाड (पूर्व) आणि बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

सहा जणांचा जागीच मृत्यू

नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या मल्टियुटिलिटी व्हेइकलची समोरून येणाऱ्या कारशी समोरासमोर धडक होऊन ही घटना घडली. सहा जणांना घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले, तर आणखी एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिवाशांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना मदत केली. जालना येथील शासकीय जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उमेश जाधव यांनी सहा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर