मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Real Estate : मुंबईत जून महिन्यात मालमत्ता नोंदणीत ११ तर मुद्रांक शुल्क संकलनात १५ टक्क्यांची वाढ

Mumbai Real Estate : मुंबईत जून महिन्यात मालमत्ता नोंदणीत ११ तर मुद्रांक शुल्क संकलनात १५ टक्क्यांची वाढ

Jun 30, 2024 09:23 PM IST

Mumbai Real Estate market : मे २०२४ मध्ये मुंबई रिअल इस्टेट मार्केटमध्ये एकूण १२,००० मालमत्ता नोंदणी झाली होती. जून महिन्यात यामध्ये ११ टक्क्यांची वाढ झाली आहे.

जून २०२४ मध्ये मुंबईतील मालमत्ता नोंदणीत ११ टक्क्यांनी वाढ
जून २०२४ मध्ये मुंबईतील मालमत्ता नोंदणीत ११ टक्क्यांनी वाढ (HT Files)

नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जून २०२४ मध्ये मुंबई रिअल इस्टेट मार्केटमधील मालमत्ता नोंदणी ११ टक्क्यांनी वाढून ११,४४३ झाली आहे. मे २०२४ मध्ये मुंबई रिअल इस्टेट मार्केटमध्ये एकूण १२,००० मालमत्ता नोंदणी झाली होती.

महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार, मुंबई रिअल इस्टेट मार्केटमध्ये मालमत्ता नोंदणीतून मुद्रांक शुल्क संकलन मे २०२४ मध्ये १५ टक्क्यांनी वाढून ९८६ कोटींवर पोहोचले आहे. गेल्यावर्षी जून २०२३ मध्ये ८५९ कोटी होते. मे २०२४ मध्ये मुद्रांक शुल्क संकलन १,०३४ कोटी रुपये होते.

मुंबईतील मासिक आधारावर होणाऱ्या एकूण मालमत्ता नोंदणीपैकी निवासी घरांचे प्रमाण सुमारे ८० टक्के आहे.

ट्रेंडिंग न्यूज

 

२०२४ च्या पहिल्या सहामाहीत नोंदणीची सरासरी संख्या २०२३ च्या १२ महिन्यांच्या सरासरीपेक्षा अधिक -

जूनमध्ये मुंबईतील मालमत्ता नोंदणीत वार्षिक वाढ झाली असली तरी पहिल्या सहा महिन्यांत सरासरी १२,०४४ युनिट्सची नोंदणी झाली आहे. जी २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांतील १०,५७८ युनिट्सच्या बारा महिन्यांच्या सरासरीपेक्षा जास्त होती. नाइट फ्रँक इंडिया या रिअल इस्टेट सल्लागाराच्या विश्लेषणानुसार, हे मुंबईच्या निवासी बाजारपेठेची ताकद आणि घर खरेदीदारांचा विश्वास दर्शविते.

तसेच, २०२४ च्या पहिल्या सहा महिन्यांत सरासरी ९७४ कोटी रुपये सरकारी महसूल संकलन २०२३ मधील सरासरी ९०६ कोटी रुपयांच्या तुलनेत ८ टक्क्यांनी अधिक आहे. महसूल वाढीचे श्रेय नोंदणी केलेल्या मालमत्तेचे उच्च प्रमाण आणि मूल्य यासारख्या अनेक घटकांना दिले जाऊ शकते, असे नाइट फ्रँक इंडियाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

मालमत्ता विक्री नोंदणीत सातत्याने होत असलेली वाढ मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारपेठेची लवचिकता अधोरेखित करते. मजबूत जीडीपी वाढ, उत्पन्नाची वाढती पातळी आणि अनुकूल व्याजदराचे वातावरण यामुळे संभाव्य खरेदीदारांसाठी उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाल्याने हा सकारात्मक कल कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले.

एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांची नोंदणी सुरूच -

जून २०२४ मध्ये ५०० ते १००० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांच्या नोंदणीत लक्षणीय वाढ झाली असून, एकूण मालमत्ता नोंदणीच्या ४६ टक्के आहे. याउलट ५०० चौरस फुटांपर्यंतच्या अपार्टमेंटची नोंदणी ३६ टक्के होती, जी जून २०२३ मध्ये ४१ टक्के होती.

यावरून मोठ्या अपार्टमेंट्सकडे स्पष्ट कल दिसून येत असून, ५०० चौरस फुटांपर्यंतच्या युनिट्सच्या वाट्याला घट दिसून येत आहे. नाइट फ्रँक इंडियाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, १,००० चौरस फूट किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या अपार्टमेंटचा एकूण नोंदणीपैकी १५% समावेश आहे.

जून २०२३ च्या तुलनेत जून २०२४ साठी घरांच्या विक्रीनोंदणीत वाढ झाली आहे, जी वार्षिक आधारावर चांगली वाढ दर्शविते. घरांच्या मागणीच्या या वाढीमागे पुनर्विकासाच्या वाढीबरोबरच शहरातील कनेक्टिव्हिटीला चालना देणे हा प्रभाव कायम आहे. ही उत्साहाची भावना कायम आहे आणि या भागातील सर्व सेगमेंट आणि मायक्रो-मार्केटमध्ये, विशेषत:  पश्चिम उपनगर आणि शिवडी-वडाळ्याच्या पूर्व पट्ट्यात ही मागणी अधिक वाढण्याची मागणी आम्ही पाहत राहू, असे अजमेरा रियल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेडचे संचालक धवल अजमेरा यांनी सांगितले.

WhatsApp channel
विभाग