एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत! शेकडो गाड्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत! शेकडो गाड्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत! शेकडो गाड्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन

Jul 29, 2024 09:21 PM IST

Pradeepsharma : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत प्रदीप शर्मा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.

 प्रदीप शर्मा यांची पत्नी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
प्रदीप शर्मा यांची पत्नी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep sharma )यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा (Swikriti Sharma)  राजकारणात प्रवेश करण्यास सज्ज झाल्या आहेत. स्वीकृती शर्मा यांनी मलबार हिल परिसरात शेकडो वाहनांच्या ताफ्यासह जोरदार शक्तिप्रदर्शन केले. स्वीकृती शर्मा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत प्रदीप शर्मा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. 

एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले प्रदीप शर्मा यांची पत्नी शिवसेना शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश करणार आहे. प्रदीप शर्मा यांनी २०१९ साली शिवसेनकडून हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात  विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर अँटिलिया प्रकरणात प्रदीप शर्मा यांचे नाव चर्चेत आले होते. प्रदीप शर्मा यांच्यावर २००६  मध्ये कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या याचा बनावट एन्काउंटर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी  शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.

प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा राजकारणात प्रवेश करणार आहेत. आज शेकडो गाड्यांसह त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. स्वीकृती शर्मा आगामी विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची चर्चा सुरू आहे. प्रदीप शर्मा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याचे बोलले जाते. स्वीकृती शर्मा यांच्या पत्नीचे विधानसभेसाठी तिकीट निश्चित मानले जात आहे. मात्र स्वीकृती शर्मा कोणत्या मतदारसंघातून लढणार हे अद्याप स्पष्ट नाही.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया -

राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंडे यांना गेल्या अनेक दिवसांपासून पित्त व पोटदुखीचा त्रास होता. मात्र सतत दौरे, सभा, कामकाज यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष होत होते.मात्र, हा पोटदुखीचा त्रास वाढल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. डॉ. अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. बुधवारी (२४ जुलै) त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

 

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर