साई दर्शनाची इच्छा अपूर्णच राहिली..! मुंबई ते शिर्डी पायी वारी जाताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  साई दर्शनाची इच्छा अपूर्णच राहिली..! मुंबई ते शिर्डी पायी वारी जाताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

साई दर्शनाची इच्छा अपूर्णच राहिली..! मुंबई ते शिर्डी पायी वारी जाताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Jan 10, 2025 08:52 PM IST

Shirdi Wari : मुंबईहून शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा वाटेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांची साई दर्शनाची इच्छा अपुरीच राहिली.

मुंबई ते शिर्डी पायी वारी जाताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
मुंबई ते शिर्डी पायी वारी जाताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. नववर्षाच्या पहिल्या दिवशी तर शिर्डीला जत्रेचे स्परुप येते. अनेक लोक नववर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात साई दर्शनाने करतात. अनेक शहरातून शिर्डीला पालख्या जात असतात. नवीन वर्षातील पहिल्या महिन्यात मुंबईहून शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी पायी वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पदयात्रेत सामील झालेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा वाटेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांची साई दर्शनाची इच्छा अपुरीच राहिली. 

प्रफुल सुर्वे असे मृत्यू झालेल्या या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. प्रफुल्ल सुर्वे हे ३१ डिसेंबर २०२५ रोजी म्हणजे वर्षभरात पोलीस दलातून निवृत्त होणार होते. शिर्डी केवळ १० किमी अंतरावर असताना  पोलिसाचा रस्त्यातच मृत्यू झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करत आहेत. 

मुंबई ते शिर्डी पायी यात्रेदरम्यान आज (शुक्रवार) सकाळी सुर्वे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. प्रफुल्ल सुर्वे हे दरवर्षी अंधेरी ते शिर्डी पायी वारी करत असत. मात्र यंदा शिर्डीला पोहोचण्यासाठी अवघे १० किलोमीटर अंतर बाकी असतानाच त्यांचे निधन झाले. सुर्वे यांच्या निधनाने साई पालखी मंडळ आणि अंधेरी पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. 

प्रफुल्ल सुर्वे १९९३ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. त्यांनी सुरुवातीला एल ए २ वरळी विभागात काम केल्यानंतर त्यांनी राज्य गुप्त वार्ता, वर्सोवा पोलीस ठाणे येथे सेवा बजावल्यानंतर  सध्या ते अंधेरी पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार या पदावर कार्यरत होते. 

विशेष म्हणजे मुंबई ते शिर्डी २४० किमी अंतर आहे. त्यापैकी पालखी मंडळाने २३० किमीपर्यंत पायी प्रवास केला होता. शिर्डीला पोहोचण्यासाठी केवळ १० किलोमीटरचे अंतर बाकी असतानाच सुर्वें यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर