मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Salman Khan Death Threat : सलमान खान धमकी प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांचं इंग्लंड सरकारला पत्र
Salman Khan Death Threat
Salman Khan Death Threat (HT_PRINT)

Salman Khan Death Threat : सलमान खान धमकी प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांचं इंग्लंड सरकारला पत्र

29 March 2023, 14:37 ISTAtik Sikandar Shaikh

Salman Khan Death Threat : कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Salman Khan Death Threat : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला १८ मार्च रोजी ई-मेलच्या माध्यमातून अज्ञात आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने धमकी दिल्यानंतर देशाबाहेरून सलमानला धमकी देण्यात आल्याच्या प्रकरणानंतर आता मुंबई पोलिसांनी आरोपीच्या शोध घेण्यास सुरुवात केली आहे. सलमानला धमकी देणारा ई-मेल लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार आणि कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारने दिल्याचा संशय मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास करून आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी मुंबई पोलिसांनी थेट इंटरपोलचं सहकार्य घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेता सलमान खानला इंग्लंडमधील एका व्यक्तीनं ई-मेल पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आरोपी हा इंग्लंडमध्ये असल्यानं मुंबई पोलिसांनी इंग्लंड सरकारला एक पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. ज्या उपकरणावरून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, त्याचा आयपी अॅड्रेसही मुंबई पोलिसांनी यूकेच्या सरकारकडे सोपवला आहे. सलमानला धमकी देणारा ई-मेल गोल्डी ब्रारने पाठवला असून तो इंग्लंडमध्ये असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. त्यामुळं आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांसह इंग्लंडचे पोलीसही सरसावण्याची शक्यता आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी लॉरेन्स बिश्नोईने काही दिवसांपूर्वीच सलमान खानला दोनदा जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर इंग्लंडमधूनही धमकीचा ई-मेल आल्यामुळं मुंबई पोलिसांनी सलमान खानला झेड-प्लस सुरक्षा दिली होती. याशिवाय मुंबईतील अनेक वरिष्ठ अधिकारी सलमानच्या सुरक्षेवर नजर ठेवून होते. त्यानंतर आता सलमानसह त्याच्या कुटुंबियांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित न राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.