Coldplay ticket black market case : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांच्या कथित काळ्या बाजारातील विक्रीच्या चौकशीच्या संदर्भात बूक माय शोची मूळ कंपनी बिग ट्री एंटरटेनमेंटचे सीईओ आशिष हेमराजानी आणि कंपनीच्या आणखी का प्रमुखाला समन्स बजावले आहे. या दोघांना आज शनिवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
डीवाय पाटील स्टेडियमवर १९ ते २१ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या बहुप्रतीक्षित कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार करत असल्याचा आरोप करत अधिवक्ता अमित व्यास यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बूक मआयशो च्या सीईओना समन्स जारी करण्यात आला आहे.
व्यास यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शो ची २५०० रुपये किमतीची असलेली तिकिटे आता थर्ड पार्टी तसेच इन्फ्लुएंसरकडून तब्बल तीन लाख रुपयांना पुन्हा विकली जात आहेत. बूक माय शोने जनतेची आणि कोल्डप्लेच्या चाहत्यांची फसवणूक केल्याचा आरोप व्यास यांनी केला आहे. त्यांनी कंपनीविरुद्ध फसवणुकीच्या आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) व्यास यांचे स्टेटमेंटची दाखल घेतली आहे. आणि कथित तिकीट स्कॅल्पिंगमध्ये गुंतलेले अनेक दलालांचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणासंदर्भात आणखी काही जणांना समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.
कोल्डप्ले कॉन्सर्ट, १९ ते २१ जानेवारी, २०२५ दरम्यान, डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे, हा कार्यक्रम या वर्षातील सर्वात आतुरतेने वाट पाहत असलेल्या एका कार्यक्रमांपैकी एक आहे.