मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Police News : ८ महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार झाल्याची बातमी खोटी? मग व्हायरल झालेलं पत्र कुणी लिहिलं?

Mumbai Police News : ८ महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार झाल्याची बातमी खोटी? मग व्हायरल झालेलं पत्र कुणी लिहिलं?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 08, 2024 02:48 PM IST

Senior Police Rapes Women Constables Fake News: वरिष्ठांकडून ८ महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार झाल्याची बातमी खोटी असल्याची माहिती समोर आली

Mumbai Police
Mumbai Police (PTI)

Mumbai Police Fake Letter: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या ८ महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार झाल्याचे पत्र मिळाले. या पत्रातून वरिष्ठ पोलिसांविरोधात बलात्कार, लैंगिक छळ आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले. हे पत्र शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर इंडियन एक्स्प्रेसने संबंधित महिला कॉन्स्टेबल यांच्याशी संपर्क साधला असता, हे पत्र त्यांनी लिहिले नसल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस कॉन्स्टेबलवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून वारंवार बलात्कार करण्यात आला. एवढेच नाहीतर महिला पोलीस गरोदर राहिल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करुन त्यांना गर्भपात करण्यास भागही पाडण्यात आले, अशा आशयाचे पत्र एकनाथ शिंदेंसह मुंबई पोलिस आयुक्त आणि पोलिस सहआयुक्त यांना पाठवण्यात आले, अशी माहिती आहे.

पत्रात असेही लिहिण्यात आले होते की, आम्ही छोट्याशा गावातून आल्यामुळे आमचा गैरफायदा घेण्यात आला. आम्हाला ड्युडीअर कोणतेही काम न देण्याचे आमिष दाखवून वरिष्ठांनी आम्हाला शासकीय निवासस्थानी नेऊन आमच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तसेच वरिष्ठांनी शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देत महिला कॉन्स्टेबलवर वारंवार अत्याचार करण्यात आला, असाही या पत्रात उल्लेख करण्यात आला. या पत्रानंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ माजली. परंतु, याबाबत अधिक चौकशी केली असता या पत्रातील माहिती खोटी असल्याचे चौकशीत उघड झाले.

“आमची बदनामी करण्यात करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. आम्ही निर्दोष आहोत. विभागातील काही लोक आमच्या कामावर नाराज आहेत. मोटार वाहन विभागातील एका अधिकाऱ्याच्या सहभागाचा आम्हाला ठाम संशय आहे. याप्रकरणी आम्ही पोलीसांत तक्रार नोंदवू”, अशी माहिती पत्रात उल्लेख करण्यात आलेल्या एका पोलीस निरीक्षकाने दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

WhatsApp channel