Dreams Mall : मुंबईत भांडुप येथील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dreams Mall : मुंबईत भांडुप येथील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

Dreams Mall : मुंबईत भांडुप येथील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

Jan 21, 2025 04:09 PM IST

Mumbai Dreams Mall News : मुंबईतील भांडुप येथील ड्रीम मॉलच्या बेसमेंटमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मुंबई: भांडुप येथील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह
मुंबई: भांडुप येथील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

Mumbai Bhandup News: मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील पंचतारांकित हॉटेल ट्रायडंटमधील एका खोलीत वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना काल (२० जानेवारी) घडली. या घटनेला २४ तास उलटले नाही तोच, मुंबईतील भांडुप येथील ड्रीम मॉलच्या बेसमेंटमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप पोलिसांना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ड्रीम मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर भांडुप पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. भांडुपच्या व्हॅन मोबाईल युनिटच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुलुंड जनरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. मयत महिला साधारण ३५ ते ४० वर्ष वयाची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र अद्याप तिची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अपघात की घातपात?

हा मॉल गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. मग मयत महिला कशासाठी मॉलच्या बेसमेंटमध्ये गेली होती? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच हा अपघात आहे की घातपात? याचाही पोलीस शोध घेत आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होईल.

अनेक वर्षांपासून मॉल बंद

भांडुपमधील प्रसिद्ध ड्रीम मॉलला काही वर्षांपूर्वी भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत संपूर्ण मॉल जळून खाक झाला. तेव्हापासून हा मॉल बंदच आहे. मात्र, मॉल बंद असल्याचा गैरफायदा घेत काही तरुण-तरुणी बंद मॉलच्या आत जाऊन अश्लील चाळे करतात. तर, काहीजण आमली पदार्थाचे व्यसन देखील करतात, अशी माहिती स्थानिक लोकांकडून मिळाली. याचबरोबर स्थानिक लोकांनी या भागात सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर