Mumbai Police : मुंबई पोलिसांनी वाचवले महिला ट्रेकरचे प्राण, अदम्य साहसाचं सोशल मीडियावर कौतुक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Police : मुंबई पोलिसांनी वाचवले महिला ट्रेकरचे प्राण, अदम्य साहसाचं सोशल मीडियावर कौतुक

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी वाचवले महिला ट्रेकरचे प्राण, अदम्य साहसाचं सोशल मीडियावर कौतुक

Updated Jan 29, 2024 03:24 PM IST

Mumbai Police Viral Video : मुंबई पोलिसांनी एक जखमी गिर्यारोहक महिलेचे प्राण वाचवले आहेत. ही महिला कर्नाळा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेली होती.

Mumbai Police Video
Mumbai Police Video

Mumbai Police Rescued Climber Women at Raigad : मुंबई पोलिसांनी एका महिला गिर्यारोहकाचे प्राण वाचवले आहेत. ही महिला रायगड जिल्ह्यात (२७ जानेवारी) ट्रेकिंगसाठी गेली होती. ट्रेकिंगरम्यान त्या महिलेला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ती तिथेच अडकून पडली. यानंतर मुंबई पोलीस या महिलेच्या मदतीला देवदूत बनून धावले. या मदत कार्याचा व्हिडीओ मुंबई पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅंडलवरून शेअर केला आहे.

मुंबई पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीमच्या सदस्यांनी ही मोहीम फत्ते केली. पोलिसांनी कपड्यांचा वापर करून तात्पुरते स्ट्रेचर बनवले आणि महिलेला खाली बेस कॅम्पवर आणले. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीनंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे.

वास्तविक, संबंधित महिला ही काही गिर्यारोहकांसमवेत शनिवारी (२७ जानेवारी) रायगडच्या कर्नाळा किल्ल्यावर ट्रेकिंगला गेली होती. यावेळी ती महिला दुखापतग्रस्त झाली. पण सुदैवाने मुंबई पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीममध्ये नव्याने सामिल झालेले काही जवान तेथेच ट्रेनिंग करत होते. तेथील ट्रेनिंग पूर्ण करून हे पोलीस खाली उतरत असताना त्यांनी जखमी महिलेची माहिती मिळाली, यानंतर जवानांनी महिलेला सुखरूप रेस्क्यू केले.

आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. तसेच, मुंबई पोलिसांचे कौतुक होत आहे. व्हिडीओत मुंबई पोलीस जखमी महिलेला कपड्यांच्या साह्याने बनवलेल्या स्ट्रेचरमधून घेऊन जाताना दिसत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर