Mumbai Police: मुंबईतील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या २८ जानेवारीपर्यंत सुट्ट्या रद्द!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Police: मुंबईतील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या २८ जानेवारीपर्यंत सुट्ट्या रद्द!

Mumbai Police: मुंबईतील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या २८ जानेवारीपर्यंत सुट्ट्या रद्द!

Jan 22, 2024 10:44 AM IST

Mumbai Police Leaves Cancelled: अयोध्येतील राम मंदिराचे अभिषेक, मनोज जरांगे- पाटील यांची पदयात्रा आणि प्रजासत्ताक दिनामुळे मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai Police
Mumbai Police (PTI)

Mumbai Police personnel Leave Cancelled till January 28: अयोध्येतील राम मंदिराचे अभिषेक, मनोज जरांगे- पाटील यांची पदयात्रा आणि प्रजासत्ताक दिनासह अनेक प्रमुख सार्वजनिक कार्यक्रमांमुळे मुंबईतील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या येत्या २८ जानेवारीपर्यंतच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. वैद्यकीय रजेवर असलेल्या पोलिसांना निर्देशातून वगळण्यात आले आहे.

अयोध्येत आज होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. संवेदनशील भागात रॅलीच्या वेळी गुप्तचर आणि गुन्हे शाखेचे पथक नागरीकांमध्ये तैनात केले जाणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे. त्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची गरज आहे. या दरम्यान लाखो लोक मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची मुंबईत पदयात्रा निघणार आहे.

याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यामुळे येत्या २८ जानेवारीपर्यंत मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर