अनंतचतुर्थीनिमित्त मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. हा विसर्जन सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी मुंबई महापालिका तसेच मुंबई पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जन मिरवणुकीनिमित्त मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत तर काही पर्यायी मार्ग दिले आहेत. त्याचबरोबर शहरातील १३ धोकादायक पुलांची यादीही महापालिकेने दिली आहे. या पुलावरून मिरवणूक जात असताना १०० पेक्षा अधिक व्यक्ती एकाच वेळी नसाव्यात, असे निर्देश दिले आहेत.
गणेश विसर्जनानिमित्त मंगळवारी शहरातील वाहतूक व्यवस्था तात्पुरती डायवर्ट केली आहे. काही रस्ते बंद करण्यात आले आहेत तर काही मार्गावरील एकतर्फी वाहतूक सुरू राहणार आहे.
विसर्जन सोहळ्यादरम्यान वाहतूक कोंडीपासून वाचवण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. उत्तर मुंबई ते दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज रोड खुला आहे.
अटल सेतुवरून दक्षिण मुंबईत विलासराव देशमुख ईस्ट फ्रीवे (फ्रीवे) मार्ग पी डी'मेलो रोड-कल्पना जंक्शनवरून डावीकडे वळून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - महापालिका मार्ग - मेट्रो ते प्रिंसेस स्ट्रीट ते कोस्टल रोडकडे जाता येणार आहे.
मध्य रेल्वे: घाटकोपर ओव्हर ब्रीज, करी रोड, चिंचपोकळी, भायखला रेल्वे ओव्हर ब्रीज
पश्चिम रेल्वे: फ्रेंच ब्रीज, केनेडी ब्रीज, बेलासिस ब्रीज, महालक्ष्मी स्टील रेल्वे ब्रीज, प्रभादेवी पारल रेल्वे ओव्हर ब्रिज, मरीन लाइन्स दरम्यानचा दादर तिलक ब्रीज, सँडहस्ट, ग्रँट रोड आणि चर्नी रोड ब्रीज.