Mumbai Police : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, १०७ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त, ४ जणांना अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Police : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, १०७ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त, ४ जणांना अटक

Mumbai Police : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, १०७ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त, ४ जणांना अटक

May 12, 2024 05:34 PM IST

Mumbai Police Busted Illegal Drugs Factory: मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील बेकायदेशीर एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा भंडाफोड केला.

मुंबई पोलिसांंनी १०७ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले.
मुंबई पोलिसांंनी १०७ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. (PTI)

Mumbai Police News: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई करत राजस्थानमधील (Rajasthan) जोधपूर (Jodhpur) येथील बेकायदेशीर एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा भंडाफोड केला. मुंबई पोलिसांनी येथून सुमारे १०७ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या एका पथकाने राजस्थानमधील जोधपूर येथील एमडी ड्रग्जच्या एका बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश केला, ज्याची किंमत १०७ कोटी रुपये आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

 

साकीनाका पोलिसांच्या पथकाने जोधपूरमधील एमडी ड्रग्स कारखान्याचा शोध घेतला आणि तेथून ड्रग्ज जप्त केले. या बेकायदेशीर ड्रग्ज फॅक्टरीचे मुंबईसह देशाच्या इतर भागांशीही कनेक्शन असावे, असा पोलिसांना संशय आहे. मुंबई पोलिसांची ड्रग्ज माफियांविरोधातील ही मोठी कारवाई आहे. पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील मोगरा येथून मुंबईला मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सापळा रचून जोधपूर येथील एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा भंडाफोड केला. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलिसांकडे तक्रारी येत होत्या.

मुंबई: पोटात ड्रग्ज लपवून आणणाऱ्या ब्राझिलियन नागरिकाला अटक

मुंबई विमानतळावर डीआरआयने पोटात ड्रग्ज लपवून आणणाऱ्या ब्राझिलियन नागरिकाला अटक केली. आरोपीच्या पोटातून तब्बल ११० कॅप्सूल काढण्यात आल्या असून त्या कॅप्सूलमधून ९७५ ग्रॅम कोकीन सापडले. या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १० कोटी रुपये असल्याची माहिती आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ब्राझिलियन मुंबई विमानतळावरून ड्रग्ज घेऊन जात असल्याचा संशय आल्यानंतर त्याला अडवण्यात आले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने भारतात तस्करी करण्यासाठी ड्रग्ज असलेल्या कॅप्सूल खाल्ल्याची बाब कबूल केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर