Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

May 08, 2024 03:55 PM IST

Constable on election duty dies of cardiac arrest: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा मृत्यू.
मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा मृत्यू.

Mumbai Police Constable Dies: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या एका पोलीस हवालदाराचा बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृत हवालदार मध्य मुंबईच्या दादर येथे निवडणूक कर्तव्यावर तैनात होते. सकाळी ड्युटीवर पोहोचताच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

chicken shawarma news : धक्कादायक! मुंबईत रस्त्यावरील निकृष्ट चिकन शॉर्मा खाल्ल्याने एकाचा मृत्यू; दोघांना अटक

एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृत हवालदार मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात संलग्न होता आणि गेल्या काही दिवसांपासून दादरमधील स्ट्राँग रूममध्ये (जेथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ठेवली जातात) तैनात होते. ही घटना बुधवारी सकाळी ७.४० च्या सुमारास घडली. विलास यादव असे मृत हवालदाराचे नाव असून तो ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील रहिवासी आहे.

Palghar Crime: आधी सोशल मीडियावरून केली मैत्री, नंतर भेटायला बोलावून केले कांड! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यादव हे बुधवारी सकाळी हायस्कूलमध्ये स्ट्राँग फॉर्ममध्ये ड्युटीसाठी गेले, जिथे त्याचा फ्लाइंग स्क्वाडमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. याानंतर त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

Pune warje firing : बारामतीमध्ये मतदान संपताच पुण्यातील वारजे माळवाडीत गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या तिघांनी केले फायरिंग

कर्नाटकात दोन आणि बिहारमध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यू

याआधी कर्नाटकमध्ये निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा आणि बिहारच्या सुपौलमध्ये एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कर्नाटकात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एक कर्मचारी शिक्षण विभागात कार्यरत होता. तर, दुसरा कर्मचारी कृषी विभागात सहायक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होता. याशिवाय बिहारमध्ये मृत्यू झालेला कर्मचारी शिक्षण विभागात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता.

बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील आळेफाटा जवळील काळवाडी येथे दुर्दैवी घटन घडली. मामाच्या गावाला यात्रेसाठी आलेल्या एका आठ वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रुद्र महेंद्र फापाळे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर