मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  G20 Summit Mumbai : जी-२० समिटसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल; प्रवासासाठी वापरा हे पर्यायी रस्ते

G20 Summit Mumbai : जी-२० समिटसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल; प्रवासासाठी वापरा हे पर्यायी रस्ते

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 13, 2022 11:12 AM IST

G20 Summit Mumbai Today : जी-२० समिटमुळं मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे.

G20 Summit Mumbai Today Live Updates
G20 Summit Mumbai Today Live Updates (HT)

G20 Summit Mumbai Today Live Updates : मुंबईतील बीकेसीत जी-२० शिखर परिषदेची पहिली बैठक होणार आहे. सकाळी ९.३० च्या सुमारास डेटा फॉर डेव्हलपमेंट या विषयावर विविध देशांतील प्रतिनिधींनी चर्चासत्रात भाग घेतला असून संध्याकाळी हॉटेल ताजमहालमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं शहरातील अनेक रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. याशिवाय बीएमसीनं परिसरात स्वच्छताही केली आहे. परंतु जी-२० समिटसाठी जगभरातून आलेल्या प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी शहरातील वाहतुकीत मोठा बदल केला आहे. त्यामुळं मुंबईकरांना प्रवासासाठी पर्यायी मार्ग मुंबईतील वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून दिले आहेत.

जी-२० शिखर परिषदेसाठी येत्या १६ डिसेंबरपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून त्यामुळं वाकोला, खेरवाडी आणि वांद्रे-कुर्ला परिसरातील वाहतूक प्रभावित होणार आहे. नेहरु रोडवरून हयात हॉटेलकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. याशिवाय हयातकडून सीएसटीकडे जाणाराही मार्ग बंद करण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज मार्गही वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं घेतला आहे.

पर्याय मार्ग कोणते वापराल?

नेहरू रोडवरून जाणारी वाहतूक मिलिट्री कॅम्प जंक्शनमार्गे कलिना जंक्शनमार्गे हंस भुग्रा मार्गावर वळवण्यात आली आहे. जुन्या सीएसटीच्या मार्गानं जाणारी वाहतूक हंस भुग्रा मार्गावरून वाकोला, सांताक्रूझमार्गे पश्चिम द्रुतगती मार्गावर वळवण्यात आली आहे. याशिवाय नेहरू रोडवरून पटूक जंक्शनमार्गावरून जाणारी वाहतूक मिलिट्री कॅम्पमार्गे आंबेडकर जंक्शन किंवा हंस भुग्रा मार्गावर वळवण्यात आली आहे.

IPL_Entry_Point