Mumbai: तुमच्या घरातील लोणी-तूप भेसळयुक्त तर नाही ना? मुंबई पोलिसांच्या कारवाईत धक्कादायक प्रकार उघड!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: तुमच्या घरातील लोणी-तूप भेसळयुक्त तर नाही ना? मुंबई पोलिसांच्या कारवाईत धक्कादायक प्रकार उघड!

Mumbai: तुमच्या घरातील लोणी-तूप भेसळयुक्त तर नाही ना? मुंबई पोलिसांच्या कारवाईत धक्कादायक प्रकार उघड!

Updated Jun 15, 2024 08:00 PM IST

Mumbai Police Busts Butter and Ghee Racket: मुंबई पोलिसांनी लोणी आणि तूपमध्ये भेसळी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला.

मुंबईत लोणी आणि तूपमध्ये भेसळी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
मुंबईत लोणी आणि तूपमध्ये भेसळी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हे शाखेने शहरातील लोणी आणि तूप मध्ये भेसळी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. तसेच त्यांच्याकडून १.२ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य जप्त केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून दक्षिण मुंबईतील एलटी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिरा बाजार येथील नानाभाई बिल्डिंगमधील एका दुकानावर छापा टाकण्यात आला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

लोकप्रिय तुपाच्या ब्रँडमध्ये भेसळ करणाऱ्या दोन संशयितांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. चमन शामू यादव (वय, ४०) आणि झमन शामू यादव (वय, ५५) अशी संशयितांची नावे आहेत. दोघेही जोगेश्वरी येथील रहिवासी आहेत. पाम तेल, वनस्पती, बटर कलर आणि फ्लेवरिंग एजंट यांचे मिश्रण करून बनावट तूप तयार करताना या दोघांना रंगेहात पकडण्यात आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

घटनास्थळावरून एकूण ७८० लिटर बनावट तूप जप्त

मुंबई पोलिसांच्या कारवाईदरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त तूप आणि संबंधित साहित्य जप्त आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ७८० लिटर बनावट तूप जप्त केले. याशिवाय, स्टीलची टाकी, फनेल, प्लास्टिक मग, किटली, फ्लेवर बॉक्स, पाम तेल, सूर्यफूल तेल, पॅकिंग मशीन, अमूल शुद्ध तुपाची रिकामी पाकिटे जप्त केली.

संशयितांविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी संशयितांना ताब्यात घेण्यात आले आणि भारतीय दंड संहिता आणि अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त केलेले साहित्य नंतर एल.टी. मार्ग पोलिस स्टेशनला सुपूर्द करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

नागपूर: सलूनमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नागपूरच्या वर्धमान नगरमधील सलूनमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी प्रिती शुभम शेंडे उर्फ ​​प्रिती साहू हिला अटक करण्यात आली. तर, चार महिलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ८९ हजार ९३० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर