Mumbai Crime News Marathi : मायानगरीत मुंबईतून अतिशय संतापजनक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका धावत्या टॅक्सीत मतिमंद मुलीवर दोन आरोपींनी अत्याचार केला आहे. पीडित मुलगी घरच्यांशी भांडणं करून दक्षिण मुंबईतून टॅक्सीत बसली होती. त्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरने दोन साथीदारांसह मुलीवर अत्याचार करत बलात्कार केला आहे. मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला शहरातील वाकोला परिसरात सोडलं. त्यानंतर या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी आरोपी सलमान आणि प्रकाश पांडे या दोघांना अटक केली आहे. आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईत राहणाऱ्या १४ वर्षीय मतिमंद मुलीचं घरच्यांसोबत भांडणं झाली होती. त्यानंतर रागाच्या भरात मुलीने घराजवळून टॅक्सी पकडली. याच संधीचा फायदा घेत आरोपी सलमान आणि त्याचा साथीदार प्रकाश पांडे यांनी मतिमंद मुलीवर टॅक्सीत अत्याचार करत बलात्कार केला. मुलीने वाकोला परिसरात उतरल्यानंतर पोलिसांनी तिची विचारपूस केली. त्यावेळी तरुणीने घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज चेक करत तातडीने दोन्ही आरोपींना अटक केली आहे. रात्री तीन ते चार वाजेच्या सुमारास ही घडना घडली असून पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी आरोपींना दादर परिसरातून अटक केली आहे. आरोपींनी पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाणे गाठलं आहे. त्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. पीडितेची प्रकृती स्थिर असून तिच्या अंगावर किरकोळ जखमा असल्याची माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात एका विवाहित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता एका मतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे.