आधी दारू पाजली, नंतर गळा चिरून शरीराचे केले ७ तुकडे; गोराई हत्या प्रकरणातील खूनी सापडला, कारण धक्कादायक!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आधी दारू पाजली, नंतर गळा चिरून शरीराचे केले ७ तुकडे; गोराई हत्या प्रकरणातील खूनी सापडला, कारण धक्कादायक!

आधी दारू पाजली, नंतर गळा चिरून शरीराचे केले ७ तुकडे; गोराई हत्या प्रकरणातील खूनी सापडला, कारण धक्कादायक!

Nov 14, 2024 08:07 AM IST

Mumbai Murder: मुंबईतील गोराई समुद्रकिनाऱ्याजवळील जंगलात सात तुकड्यांमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले

मुंबई: गोराई हत्या प्रकरणातील खूनी सापडला
मुंबई: गोराई हत्या प्रकरणातील खूनी सापडला

Mumbai News: मुंबईतल्या गोराई समुद्रकिनाऱ्याजवळ दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह सात तुकडे केलेल्या अवस्थेत आढळून आला. या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी मुंबई पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मुंबईतील गोराई समुद्रकिनाऱ्याजवळील रस्त्यावरील झुडपातून दुर्गंधी येत असल्याची माहिती बाबर पाडा येथील रहिवाशांनी सोमवारी पहाटे गोराई पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना सात पिशव्या सापडल्या, ज्यात मानवी शरीराचे काही भाग होते. मृतदेह आधीच कुजलेला असल्याने पोलिसांनी तो तात्काळ शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवला. मृतदेहाचे अवयव गोळा केले असता हा मृतदेह २५ ते ४० वयोगटातील एका व्यक्तीचा असल्याचे समजले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ व २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. मृताच्या डाव्या हातावर असलेल्या टॅटूवरून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.

आधी दारू पाजली नंतर गळा चिरला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद सत्तार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो भाईंदर येथील झोपडपट्टीत राहतो. मृत आणि आरोपी दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी आरोपीने मयताला भाईंदर येथील झोपडपट्टीत बोलावून घेतले आणि त्याला दारू पाजली. त्यानंतर अचानक त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. घटनेच्या वेळी मयत मद्यधुंद अवस्थेत होता. यानंतर आरोपीने मयताच्या शरिराचे सात तुकडे करून वेगवेगळ्या पिशवीत भरले. आरोपी दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेहाचे तुकडे घेऊन ऑटोरिक्षात गोराईला पोहोचला आणि तेथील जंगलात फेकून पळून गेला.

हत्येचे कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रघुनंदन (वय, २१) असे मृताचे नाव आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रघुनंदन हा आरोपी सत्तारच्या १७ वर्षीय बहिणीच्या संपर्कात होता. पण सत्तारला त्यांची मैत्री आवडली नाही. यामुळे सत्तार आपल्या बहिणीला घेऊन मुंबईत आला. मात्र त्यानंतर रघुनंदनही मुंबईत कामाला आला. दोन महिन्यांपूर्वी सत्तार यांनी रघुनंदन यांना बहिणीपासून दूर राहण्याची सूचना केली. मात्र, तरीही रघुनंदन सत्तारच्या बहिणीच्या संपर्कात होता. यामुळे संतप्त होऊन सत्ताने रघुनंदनची हत्या केली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर