मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai : चोरीच्या संशयावरून झालेल्या बेदम मारहाणीत मुंबईत २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पाच अटकेत
Borivali Murder
Borivali Murder (HT_PRINT)

Mumbai : चोरीच्या संशयावरून झालेल्या बेदम मारहाणीत मुंबईत २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पाच अटकेत

26 May 2023, 9:51 ISTGanesh Pandurang Kadam

Mumbai Man beaten to death : चोरीच्या संशयावरून मुंबईतील बोरिवली परिसरात एका २९ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

Borivali murder news : मुंबईतील बोरिवली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. चोरी केल्याच्या संशयावरून एका २९ वर्षीय तरुणाला पाच जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी ही घटना घडली. प्रवीण शांताराम लहाने असं मृताचं नाव असून तो एका पोलीस अधिकाऱ्याचा भाऊ आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जमावानं त्याच्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी प्रवीणची सुटका करून त्याला रुग्णालयात दाखल केले. तिथं प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर तो पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आला असता त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळं पोलिसांनी त्याला पुन्हा रुग्णालयात नेले. मात्र, तिथं त्याचा मृत्यू झाला.

आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३०४, १४३, १४४, १४७, १४८ आणि १४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून पोलीस शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

Mumbai Water cut : मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद; 'या' भागांना बसणार सर्वाधिक फटका

काही दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी भागात अशीच घटना घडली होती. त्यात एका ४२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा अशीच घटना घडल्यानं चिंता व्यक्त होत आहे.

विभाग