Mumbai Cylinder Blast News: मुंबईतील चेंबूर परिसरात म्हाडाच्या इमारतीत सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. या आगीत एक महिला होरपळली असून सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही घटना शु्क्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. परंतु, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या वाशिनाका परिसरात म्हाडाच्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या आगीतून सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर, एक महिला होरपळल्याची माहिती आहे.