Mumbai Accident News Today: मुंबईतील लोअर परळमध्ये रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कार चालकाविरोधात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मुंबईतील लोअर परळ येथे रविवारी एका कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी कारचालकाविरोधात एनएम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष कैलास सिंह असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत आयुष हा आपल्या सहकारी शिवम कमलेश सिंह (वय,२२) आणि विशाल प्रेमबहादूर सिंह (वय, २१) यांच्यासोबत जात असताना करी रोड पुलावर एका भरधाव कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली.या अपघातात तिघेही जखमी झाले. त्यांना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आयुषचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक मनीष सिंग याला भारतीय न्याय संहिता कायद्याच्या संबंधित कलमान्वये अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू आहे.
मुंबईतील मालाड परिसरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका २७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने महिलेला चिरडले आणि काही अंतरापर्यंत ओढले, ज्यामुळे गंभीर जखमी झाले. आरोपी ड्रायव्हरने तिला इतरांसोबत हॉस्पिटलमध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शहाना काझी असे या महिलेचे नाव असून ती क्लासला हजेरी लावून घरी जात असताना मंगळवारी रात्री उशिरा कारने तिला धडक दिली. मृतमहिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी बीएनएस आणि एमव्हीएच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अनुज सिन्हा (वय, ५०) असे या आरोपीचे नाव आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली.