मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Fire: गॅस गळतीमुळे घराला लागलेल्या आगीत ९ जण होरपळले; मुंबईच्या चेंबूर परिसरातील घटना

Mumbai Fire: गॅस गळतीमुळे घराला लागलेल्या आगीत ९ जण होरपळले; मुंबईच्या चेंबूर परिसरातील घटना

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 02, 2024 11:06 AM IST

Mumbai Chembur Gas Leak: मुंबईच्या चेंबूर परिसरात गॅस गळतीमुळे घराला लागलेल्या आगीत ९ जण होरपळल्याची घटना उघडकीस आली.

Mumbai Fire News
Mumbai Fire News

Mumbai Chembur Siddharth Colony Gas Leak News: मुंबईच्या चेंबूर पूर्वेतील सिद्धार्थ कॉलनीत गुरुवारी रात्री उशीरा गॅस गळतीमुळे घराला आग लागली. या आगीत १७ वर्षाच्या मुलासह ९ जण होरपळले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत माहिती दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

ट्रेंडिंग न्यूज

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीत गुरुवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास गॅस गळतीमुळे आग लागली. या आगीत ९ जण होरपळले.जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या एक फायर इंजिन, एक जेटी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. दरम्यान, १०-१५ मिनिटांत आग आटोक्यात आली, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

samruddhi mahamarg accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; लक्झरी बसची ट्रकला धडक, १६ प्रवासी गंभीर जखमी

संगिता गायकवाड ( वय, ५५), जितेंद्र कांबळे (वय, ४६), यशोदा गायकवाड (वय, ५६), नर्मदा गायकवाड (वय, ६०), रमेश गायकवाड (वय, ५६), श्रेयश सोनखांबे (वय, १७), श्रेया गायकवाड (वय, ४०), वृषभ गायकवाड (वय, २३) आणि संदीप जाधव (वय, ४२) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर शहरातील चार वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पालघरमध्ये पार्किंग क्षेत्रात मोठी आग; ६ ट्रक जळून खाक

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका पार्किंग क्षेत्रात मोठी आग लागली आणि त्यात मालाने भरलेले सहा ट्रक जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी पहाटे घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आग कशामुळे लागली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग