Wockhardt Hospital Bomb Threat: मुंबईच्या मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तपास सुरू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wockhardt Hospital Bomb Threat: मुंबईच्या मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तपास सुरू

Wockhardt Hospital Bomb Threat: मुंबईच्या मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तपास सुरू

Jun 17, 2024 03:47 PM IST

Mumbai News: मुंबईच्या मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी
मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी

Mumbai Police: मुंबईतील मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला सोमवारी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. रुग्णालयात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी लोकांची ये-जा रोखण्यासाठी परिसरात नाकाबंदी केली. तपासासाठी बॉम्बपथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे, अशी माहिती वसई-विरार पोलिसांनी दिली.

एनएनआय वृत्तसंस्थेने मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला सोमवारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. बॉम्बचा तपास करण्यासाठी पोलिसांनी बॉम्बशोधक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. नयानगर पोलिसांनी रुग्णालयाच्या आजूबाजूचा परिसर नाकेबंदी करून लोकांची हालचाल थांबवण्यात आली.

ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी

याआधी मुंबई पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. मुंबई पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून फोन आला होता, ज्यामध्ये ताज हॉटेल आणि शहरातील विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. बॉम्बच्या धमकीनंतर पोलीस अलर्ट झाले. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. याप्रकणी पोलिसांनी एका व्यक्तीला उत्तर प्रदेशातून अटक केली. अरविंद राजपूत असे आरोपीचे नाव आहे.

दादरमधील मॅकडॉनल्ड्समध्ये स्फोट होणार असल्याची माहिती

काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फोन आला होता, ज्यात फोन करणाऱ्याने दादरमधील मॅकडॉनल्ड्समध्ये स्फोट होणार असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी सांगितले की, फोन करणाऱ्याव्यक्तीने सांगितले की, बसमधून प्रवास करत असताना त्याने मॅकडोनाल्ड उडवण्याविषयी बोलत असलेल्या दोन लोकांमधील संभाषण ऐकले. घटनास्थळी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे ही पोलिसांनी सांगितले.

नवी दिल्लीतील म्युझियम बॉम्बने उडवून देण्याची धमकी

१२ जून रोजीच नवी दिल्लीत नॅशनल म्युझियम अँड रेल म्युझियम सह अनेक म्युझियम आणि आयएचबीएएस (इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस) आणि विमहान्स (विद्यासागर इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ, न्यूरो अँड अलाइड सायन्सेस) या दोन मानसिक आरोग्य संस्थांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ई-मेल आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की शोधामध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही आणि नंतर कॉल फसवे घोषित केले गेले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर