मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Flyover Slab Collapses: मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशनजवळील उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला

Mumbai Flyover Slab Collapses: मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशनजवळील उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला

Jul 05, 2024 09:35 AM IST

Mumbai Andheri Flyover Slab Collapses: मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशनजवळील उड्डाणपुलाचा स्लॅब एका वाहनावर कोसळला. या घटनेत वाहनचालक जखमी होण्यापासून थोडक्यात बचावला.

मुंबईतील गुंडवली मेट्रो स्टेशनजवळील अंधेरी भागात उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला
मुंबईतील गुंडवली मेट्रो स्टेशनजवळील अंधेरी भागात उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला

Slab of flyover collapses In Mumbais Andheri: मुंबईतील अंधेरी भागात उड्डाणपुलाचा स्लॅब चालत्या वाहनावर कोसळल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. ही घटना पश्चिम द्रुतगती महामार्गावर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्थानकाजवळ दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी घडली. ही इमारत कोसळण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्लॅब कारच्या बोनेटवर पडल्याने वाहनचालक थोडक्यात बचावला. या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस आणि वॉर्डकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार," सार्वजनिक बांधकाम विभागाने १९९० मध्ये हा उड्डाणपूल बांधला होता. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २०२२ मध्ये हा उड्डाणपुल मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित केला. या उड्डाण पुलाखालील जागा व्यावसायिकांसाठी होती. परंतु, न्यायालयीन वादामुळे बांधकाम तात्पुरते थांबवण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदाराला या घटनेची माहिती दिली असून पुढील दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत."

ट्रेंडिंग न्यूज

उड्डाणपुलाचा आणखी भाग कोसळण्याची शक्यता होती, तो भाग काढून टाकण्यात आला आहे. परंतु, नेमके कशामुळे उड्डाणपूलाचा स्लॅब कोसळला? यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बीएमसीने लेखापरीक्षण अहवालातील शिफारसीनंतर गेल्या वर्षी या उड्डाणपुलाची दुरुस्ती केली होती, अशी माहिती समोर येत आहे.

मुंबईतील घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर मोठा होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समिती १३ मे च्या घटनेची चौकशी करत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) होर्डिंग्जबाबत राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधानसभेत दिली. भाजप नेते आशिष शेलार यांनी कोरोना महामारीपासून उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

होर्डिंग मालकांना अनुदान आणि परवान्यावर ५० टक्के सवलत मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईतील १०२५ मोठ्या होर्डिंग्जपैकी १७९ होर्डिंग्ज रेल्वे हद्दीत असून त्यांना महापालिकेची परवानगी नाही, याकडेही शेलार यांनी लक्ष वेधले. होर्डिंग कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांना निलंबित केले आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर