Kurla Bus Accident : कुर्ल्यात भरधाव बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात, ३ ते ४ जणांचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kurla Bus Accident : कुर्ल्यात भरधाव बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात, ३ ते ४ जणांचा मृत्यू

Kurla Bus Accident : कुर्ल्यात भरधाव बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात, ३ ते ४ जणांचा मृत्यू

Dec 09, 2024 10:41 PM IST

Kurla Bus Accident : मुंबईच्या कुर्ल्यातून भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. कुर्ला एलबीएस रोडवर भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवले. या अपघातात ३ ते ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती समोर आली आहे.

कुर्ल्यात भरधाव बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात
कुर्ल्यात भरधाव बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात

Kurla Bus Accident : मुंबईतील कुर्ल्यात अपघाताची मोठी घटना घडली आहे. कुर्ला येथील लाल बहादूर शास्त्री रोडवर भरधाव बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला. भरधाव बेस्ट बसने रस्त्यावरील अनेकांना उडवल्याची माहिती आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून काहींचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भरधाव वेगाने मार्केटमध्ये घुसलेल्या बेस्ट बसने अनेक लोकांना धडक दिली. या अपघातात ३ ते ४ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

कुर्ला एलबीएस रोडवर भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवले. या अपघातात ३ ते ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती समोर आली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठत गर्दीला बाजूला सारत बचावकार्याला सुरुवात केली आहे. जखमींना आणि मृतांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भरधाव बस वर्दळीच्या वेळी मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती असून बघ्यांची गर्दी जमली आहे. या भीषण अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता -

मिळालेल्या माहितीनुसार बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. बेस्ट बस क्रमांक ३३२ ही कुर्ल्याहून अंधेरीकडे जात होती. त्याचवेळी बेस्ट बसचा ब्रेक फेल होऊन बुद्ध कॉलनीजवळील आंबडेकर नगर येथे हा अपघात झाला आहे. बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या १० ते १२ जणांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. 

या अपघातातील जखमींना सायन आणि कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. बेस्ट बसने रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षा चक्काचूर झाली आहे.  अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) रोड हा अतिशय दाटीवाटीचा परिसर असून येथे मार्केटसुद्धा आहे. गर्दीतही या परिसरात भरधाव बस चालवण्यात आली. भरधाव बेस्टने एक रिक्षासह अनेक वाहनांना तसेच लोकांना धडक दिली आहे. बेस्ट बसने दिलेल्या धडकेत एका रिक्षाचा चक्काचूर झालेला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर या मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांकडून चौकशी सुरु झाली आहे. बेस्ट चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर