Mumbai Fire News: मुंबई येथील चेंबूर कॉलनी परिसरातील संतोषी माता मंदिरात आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील चेंबूर परिसरातील संतोषी माता मंदिरात आज दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. हे मंदिर गांधी मार्केट म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाजारात आहे. यामुळे या परिसरात नेहमीच लोकांची गर्दी पाहायला मिळते. नेमक्या कोणत्या कारणामुळे आग लागली? हे समजू शकलेले नाही.
मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील १४ मजली इमारतीला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ८ (१६ ऑक्टोबर २०२४) वाजता या इमारतीला आग लागली. रिया पॅलेस इमारतीच्या दहाव्या मजल्यावर ही आग लागली. रिया पॅलेस ही इमारत ४ क्रॉस रोड अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात येतो.या आगीत तीन जण जखमी झाले. त्यांना तत्काळ कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इमारतीला आग कशी लागली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या संपूर्ण प्रकरणावर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, घटनेचा तपास केला जात असून आगीचे कारण शोधले जात आहे. चंद्रप्रकाश सोनी (वय, ७४) कांता सोनी आणि पेलुबेता अशी मृतांची नावे आहेत.
मुंबईतील चेंबूर भागातील सिद्धार्थ कॉलनी परिसरात काही दिवसांपूर्वी भीषण आग लागल्याची घटना घडली. या अपघातात ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मुंबई पोलीस आणि अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.२० वाजता आग लागली. हे दुमजली इमारत असून तळमजल्यावर दुकान होते. तर, वरच्या मजल्यावर लोक राहत होते. प्रेम गुप्ता (वय, ३०), मंजू प्रेम गुप्ता (३०), अनिता गुप्ता (वय, ३९), नरेंद्र गुप्ता (वय, १०), पॅरिस गुप्ता (वय, ७), विधी गुप्ता (वय, १५) आणि गीता देवी (वय, ६०) अशी मृतांची नावे आहेत.
संबंधित बातम्या