मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Fire: मुंबईच्या साकीनाका येथील जरीमरी परिसरात आग

Mumbai Fire: मुंबईच्या साकीनाका येथील जरीमरी परिसरात आग

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 02, 2024 06:30 PM IST

Mumbai Sakinaka Fire Today: मुंबईच्या साकीनाका परिसरात आग लागल्याची घटना घडली.

Mumbai Fire News Today
Mumbai Fire News Today

Mumbai Fire: मुंबईतील साकीनाका येथील जरीमरी परिसरात आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, या आगीमुळे परिसरात एकच खळबळ माजली.

मुंबईतील साकीनाका येथील जरीमरी परिसरात आग लागली. या आगीमुळे कुर्ला अंधेरी रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली. या आगीत अद्याप कोणतीही जिवीतहानी न झाल्याची माहिती आहे. आगीवर नियत्रंण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीमुळे इलेक्ट्रिक वायरिंग, इंस्टॉलेशन्स, पेपर रील्स, मशिनरी, तसेच कपडे आणि शिलाई मशीनसह विविध वस्तूंचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहे.

ठाणे येथील रेल्वे यार्डात रेल्वेच्या रिकाम्या डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईपासून ७० ते ८० किलोमीटर अंतरावर बदलापूर येथील रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्यात शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी आग लागली.

कर्जतकडे जाणाऱ्या रुळावर गाडी उभी होती. आगीत रेल्वेचा डबा पूर्णपणे जळून खाक झाला. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मध्य रेल्वेने सहाय्यक अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तासाभरात आग आटोक्यात आली. या आगीनंतर बदलापूर ते वांगणी स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, आगीमुळे रात्री उशिरा पर्यंत च्या अनेक लोकल मध्येच थांबवण्यात आल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग