मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BEST New Guidelines: मुंबईकरांनो.. बसमध्ये मोबाईल वापरल्यास दाखल होणार गुन्हा, वाचा काय आहे नवीन नियम

BEST New Guidelines: मुंबईकरांनो.. बसमध्ये मोबाईल वापरल्यास दाखल होणार गुन्हा, वाचा काय आहे नवीन नियम

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 27, 2023 11:58 PM IST

BEST BUS New Guidelines : बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये'इयरफोन शिवाय मोबाईलवर ऑडिओ / व्हीडीओ ऐकण्यास बघण्यास तसेच मोठया आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत असल्याचे य़ा आदेशात म्हटले आहे.

BEST New Guidelines
BEST New Guidelines

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अँड ट्रांसपोर्ट (बेस्ट) ने आपल्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या लोकांना विना हेडफोन मोबाइल फोनवर मोठ्याने बोलणे आणि मोबाइल उपकरणांवर ऑडियो/व्हिडिओ एक्सेस करण्यावर बंदी आणली आहे. बेस्टकडून सांगण्यात आले आहे की, सहप्रवाशांच्या सुविधेसाठी व प्रवाशांच्या तक्रारीनंतर बेस्ट प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. बेस्टने काही दिवसांपूर्वी याची नियमावली जारी केली आहे.

नव्या नियमानुसारबेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना मुंबई आणि उपनगरांमध्ये सार्वजनिक परिवहनामध्ये आपल्या मोबाइलवर व्हिडिओ पाहताना किंवा ऑडिओ ऐकताना हेडफ़ोनचा वापर आवश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम कलम ३८/११२ नुसार कारवाई केली जाईल.

बेस्टच्या ताफ्यात जवळपास ३,४०० बसेस आहेत. बेस्टमुंबई,ठाणे,नवी मुंबई आणि मीरा-भायंदर शहरात सार्वजनिक परिवहन सेवा प्रदान करते. बेस्टच्या बसेसमधून दररोज ३० लाख हून अधिक प्रवासी प्रवास करतात.

उपक्रमाच्या बसगाडयांमधून प्रवास करणा-या बहुतांश प्रवाशांकडे मोबाईल असतात व त्याचा वापर मुक्तपणे करण्यात येतो. अनेक प्रवासी जोरजोरात मोबाईलवर बोलत असतात. तसेच काही प्रवासी मोबाईलवर ऑडिओ, व्हिडीओ ऐकत बघत असतात. आवाजाची पातळी जास्त असल्यामुळे बसगाडीमधील अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होतो, असे यामध्ये म्हटले आहे.

 

बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये 'इयरफोन शिवाय मोबाईलवर ऑडिओ / व्हीडीओ ऐकण्यास बघण्यास तसेच मोठया आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत असल्याचे य़ा आदेशात म्हटले आहे.

IPL_Entry_Point

विभाग