मुलुंड येथे मोठ्या सोसायटीत घुसली तब्बल ९ फुटांची मार्श मगर! वनविभाग आणि RAWW नं राबावलं रेस्क्यू ऑपरेशन-mumbai news 9 foot long crocodile rescued from residential society in mulund ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुलुंड येथे मोठ्या सोसायटीत घुसली तब्बल ९ फुटांची मार्श मगर! वनविभाग आणि RAWW नं राबावलं रेस्क्यू ऑपरेशन

मुलुंड येथे मोठ्या सोसायटीत घुसली तब्बल ९ फुटांची मार्श मगर! वनविभाग आणि RAWW नं राबावलं रेस्क्यू ऑपरेशन

Sep 08, 2024 12:21 PM IST

crocodile rescued from a Mulund society : मुलुंड पश्चिम येथील निर्मल लाइफस्टाइल जवळील एका सोसायटीत आढळलेल्या मगरीला वनविभागाने आणि रेस्क्यू पथकाने पकडले असून तिला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

मुलुंड येथे सोसायटीत आढळली तब्बल ९ फुटांची मार्श मगर! वनविभाग आणि RAWW नं राबावलं रेस्क्यू ऑपरेशन
मुलुंड येथे सोसायटीत आढळली तब्बल ९ फुटांची मार्श मगर! वनविभाग आणि RAWW नं राबावलं रेस्क्यू ऑपरेशन

crocodile rescued from a Mulund society : गुजरात येथे पुरात आलेल्या मगरींचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. मात्र, मुंबईत पुर आला असतांना देखील एका सोसायटीत तब्बल ९ फुटांची भारतीय मार्श मगर आढळल्यानं खळबळ उडाली आहे. भयभीत झालेल्या सोसायटीतील नागरिकांनी याची माहिती वनविभागाला दिली. यानंतर वनविभाग आणि RAWWच्या रेस्क्यू पथकाने या मगरीला शिताफीने पकडून तिला सुरक्षित स्थळी नेलं आहे.

मुलुंड परिसरातील एका निवासी गृहनिर्माण संस्थेत घुसलेल्या नऊ फूट लांबीच्या मगरीची रविवारी सुटका करण्यात आली. मुलुंड पश्चिम येथील निर्मल लाइफस्टाइल जवळील एका सोसायटीत ही घटना आज रविवारी सकाळी घडली. या सोसायटीतील नागरिकांना सोसायटीत भली मोठी मगर घुसल्याचे दिसले. त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. आढळलेल्या मगरीला वनविभागाने आणि रेस्क्यू पथकाने पकडले असून तिला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

वन्यजीव कल्याण गटाच्या अधिकाऱ्याने या बाबत पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरच्या (रॉडब्ल्यू) सदस्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने रविवारी सकाळी या सोसायतीतून मगरीला ताब्यात घेत तिला सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

असे राबवले बचाव कार्य ?

मुलुंड परिसरातील निर्मल लाइफस्टाइल हाऊसिंग सोसायटीत मोठी मगर दिसल्याची माहिती वनविभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. रॉडब्ल्यूचे संस्थापक आणि वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक पवार शर्मा यांनी सांगितले की, त्यांना सोसायटीत मगर शिरल्याचा फोन आला. या घटनेची तातडीने दाखल घेत वनकर्मचारी आणि रेस्क्यू पथक सोसायटीत दाखल झाले. त्यांनी मगरीला शिताफीने तसेच विविध साधनांचा वापर करून सकाळी ६.३० च्या सुमारास पकडले. 'रॉडब्ल्यू'च्या सहयोगी पशुवैद्यक डॉ. प्रीती साठे आणि डॉ. कीर्ती साठे यांनी मगरीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मगरीला पुन्हा तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

जुलै महिन्यात मुंबईतील मिठी नदीतही मगर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, नदी हा त्याचा नैसर्गिक अधिवास असून नदीत जाऊ नये, असा इशारा देण्यात आला होता. याच महिन्यात चिपळूणमध्ये एक मोठी मगर मुसळधार पावसात मुख्य रस्त्यावर फिरताना आढळल्याने नागरिक भयभीत झाले होते. पावसामुळे आलेल्या पुरामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधील नद्यांजवळ मगरी दिसण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वारंवार घडल्या आहेत.

गुजरातमध्ये २४ मगरीचे रेस्क्यू ऑपरेशन

अतिवृष्टीमुळे विश्वामित्र नदीला पूर आल्याने वडोदरा येथे अवघ्या दोन दिवसांत २४ मगरींची सुटका करण्यात आली. या मगरी शहरात विविध भागात पाण्यात वाहून आल्या होत्या. या मगरींना स्थानिक नागरिक त्रास देत असल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. या मगरींना पकडून त्यांना पुनः त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले होते.

RAWW बचाव पथकातील जोकिम नाईक आणि कुणाल ठक्कर यांनी मुलुंड येथील सोसायटीत आढळलेल्या मगरीची पाहणी केली. यानंतर वन अधिकाऱ्यांच्या समन्वयाने बचाव मोहिम राबावण्यात आली. यानंतर आम्ही नऊ फूट लांबीच्या भारतीय मार्श मगरीची सुखरूप सुटका केली.

Whats_app_banner
विभाग