Powai Demolition News: मुंबईच्या पवई परिसरात बेकायदा झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस, बीएमसी अधिकाऱ्यांवर गुरुवारी दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत एकूण पाच जण जखमी झाले. या घटनेनंतर तत्काळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली, जेव्हा मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पवई येथील बेकायदा झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी गेले, अशी एका नागरी अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले होते. पवईच्या जय भवानी नगरमध्ये हा प्रकार घडला. या घटनेनंतर ताबडतोब मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, या घटनेत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. परिसरातील वातावरण शांत करण्यासाठी पोलिसांकडून झोपडपट्टी परिसरातील स्थानिक नागिरकांवर लाठीचार्ज करण्यात आला.
मुंबई महानगरपालिकेने या भागातील अतिक्रमण हटवण्यासाठी आधीच नोटीस बजावली होती. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या नोटीसनंतरही बांधकाम हटवण्यात आले नाही. पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या उपस्थितीत अतिक्रमण विरोधी पथकाने आज सकाळी १०.३० वाजल्यापासून कारवाईला सुरुवात केली. मात्र या कारवाईदरम्यान संतप्त झालेल्या झोपडपट्टीवासियांनी पोलीस आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. यानंतर दंगल नियंत्रण पथकाला प्राचारण करण्यात आले आहे. सध्या या परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
मुंबईत गेल्या २५ वर्षात झोपड्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. याआधी उच्चभ्रू परिसर म्हणन ओळखला जाणारा पवई परिसरात मोठ्या संख्येने झोपडपट्ट्या वाढल्या आहेत. रमाबाई आंबेडकर नगर, गौतम नगर, इंदिरा नगर, महात्मा फुले नगर, मोरारजी नगर, हरिओम नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वाढल्या आहेत. महत्ताचे म्हणजे, बहुतेक ठिकाणी झोपडपट्टीचे पुनर्वसन होऊनही त्याच ठिकाणी नागरिक पुन्हा घर बांधून राहत आहेत.
संबंधित बातम्या