Nalasopara Rape Crime : अनोळखी मुलांबरोबर मैत्री पडली महागात! नालासोपाऱ्यात १७ वर्षीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार-mumbai nalasopara gang rape on 17 year old girl two arrested ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nalasopara Rape Crime : अनोळखी मुलांबरोबर मैत्री पडली महागात! नालासोपाऱ्यात १७ वर्षीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

Nalasopara Rape Crime : अनोळखी मुलांबरोबर मैत्री पडली महागात! नालासोपाऱ्यात १७ वर्षीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

Aug 24, 2024 01:12 PM IST

Nalasopara rape Crime : नालासोपारा येथे एका अल्पवयीन मुलीला निर्जन स्थळी नेत दोघांची तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

अनोळखी मुलांबरोबर मैत्री पडली महागात! नालासोपाऱ्यात १७ वर्षीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
अनोळखी मुलांबरोबर मैत्री पडली महागात! नालासोपाऱ्यात १७ वर्षीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

Nalasopara rape Crime : राज्यात मुलींवरील आत्याचाराची मालिका सुरूच आहे. बदलापूर येथील प्रकरण ताजे असतांना तसेच या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलने सुरू असतांना आता मुंबईतील नालासोपारा येथे एक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. एका मुलीला काही अनोळखी मुलांसोबतची ओळख महागात पडली आहे. त्यांनी या मुलीला निर्जन स्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहते. तिची एक मैत्रीण ही नालासोपार्‍यात राहते. तिला भेटण्यासाठी ती अधून मधून नालासोपार्‍यात जात होती. यावेळी मैत्रीणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडियोत काम करणार्‍या सोनू नामक मुलासोबत गेल्या आठवड्यात तिची ओळख झाली. या काळात त्यांचे बोलणे वाढले. आरोपीने गुरुवारी तिला भेटण्यासाठी बोलावले होते. पीडित मुलगी ही आरोपीला भेटण्यासाठी नालासोपारा स्थानकात आली. यावेळी आरोपी व त्याचा दूसरा मित्र देखील सोबत होता. त्यांनी पीडित मुलीला फिरण्याच्या बहाण्याने रिक्षातून नगीनदासपाडा येथे निर्मनुष्य ठिकाणी नेले. यावेळी दोघांनी तिच्या इच्छेवइरूद्ध आळीपाळीने बलात्कार केला. तसेच तिला पुन्हा सोडून देऊन त्यांनी पळ काढला. दरम्यान, मुलीने तिच्यावर बेतलेला प्रसंग तिच्या आई वडिलांना सांगितला. त्यांनी तातडीने तुळींज पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी देखील याची दखल घेत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व त्यांना अटक करण्यात आली आहे.

पीडितेची आरोपींशी फक्त पाच दिवसांची ओळख

पीडित मुलीची आरोपीची फक्त पाच दिवसांची ओळख आहे. तिच्या मैत्रिणिकडे आल्यावर तिची आरोपींशी ओळख झाली होती. याचा गैरफायदा आरोपींनी घेतला. तिला फिरायला जाण्याच्या बहाण्याने त्यांनी बोलावून घेतले. व निर्जन स्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला.

अकोल्यात आणखी एक मुलगी अत्याचाराची बळी

बदलापूर आणि अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील घटना ताजी असतानाच पुन्हा अकोला जिल्ह्यातील हिंगणा तामसवाडी गावात एका १० वर्षीय मुलीवर अत्याचार झाला आहे. ही घटना अकोला शहरातल्या अकोटफैल पोलीस स्टेशनमध्ये हद्दीतील हिंगणा तामसवाडी येथे घडली. तेल्हारा तालुक्यातील कुटुंब काही कामानिमित्त वल्लभनगर येथील त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते. यावेळी तिच्या यश गवई नामक नतेवाइकाने तिच्यावर अत्याचार केला. ही बाब मुलीने आईला सांगितली. यानंतर ही प्रकरण उघडकीस आले.