प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-नागपूर आता फक्त ८ तासांत, समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-नागपूर आता फक्त ८ तासांत, समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-नागपूर आता फक्त ८ तासांत, समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

Jan 04, 2025 02:09 PM IST

Samruddhi Expressway : डिसेंबर २०२२ आणि मार्च २०२३ मध्ये मुंबई-नागपूर समृद्धी एक्सप्रेसवे हा महामार्ग प्रवाशांसाठी अंशत: खुला करण्यात आला होता. या मार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. पुढील महिन्यात या मार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-नागपूर आता फक्त ८ तासांत, समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-नागपूर आता फक्त ८ तासांत, समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

Samruddhi Expressway : राज्यातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी एक्सप्रेसवेचे  काम पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.  या द्रुतगती महामार्गाला 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' असे नाव देण्यात आले आहे. नागपूर ते नाशिकमधील इगतपुरी हे अंतर ६२५ किलोमीटर असून येथील काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर  मुंबई ते नागपूर अंतर अवघ्या काही तासांवर येणार आहे. पूर्वी नागपूर ते मुंबईला जाण्यासाठी  १६ तास लागत होते. हा प्रवास आता  ८ तासांवर येणार आहे.

समृध्दी महामार्ग हा राज्याच्या विकासाचा महामार्ग आहे असे म्हणत या मार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. हा मार्ग डिसेंबर २०२२  आणि मार्च २०२३  मध्ये प्रवाशांसाठी  अंशत: खुला करण्यात आला आहे. आता या मार्गाच्या शेवटच्या विभागाचे बांधकामही पूर्ण झाले असून पुढील   फेब्रुवारी महिन्यात या मार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी अनिल कुमार बळीराम गायकवाड यांची मुख्य अभियंता म्हणून निवड केली होती. गायकवाड हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे बोलले जाते. हा मार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची पातळी कमी करण्याच्या उद्देशाने चार प्रकल्पांचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील खासदारांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला आहे. पूर्व दिल्लीचे खासदार हर्ष मल्होत्रा यांनी बुधवारी ही माहिती दिली. मंत्रालयातील कनिष्ठ मंत्री मल्होत्रा म्हणाले की, दिल्ली-डेहराडून द्रुतगती महामार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर आहे आणि लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाईल. त्याचप्रमाणे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गही लवकरच खुला करण्यात येणार असून, दिल्ली ते मुंबई हा प्रवास पूर्वीच्या ३६ तासांऐवजी १२ तासांत पूर्ण होणार आहे. शिवमूर्ती ते नेल्सन मंडेला मार्गापर्यंत भूमिगत बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव मांडला असून  ज्यामुळे आयजीआय विमानतळ ते दिल्ली प्रवासाचा वेळ सुमारे ७ ते ८  मिनिटांनी कमी होणार आहे.  

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर