मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा ‘या’ दिवशी होणार खुला; नागपूर ते नाशिक अंतर ६ तासात गाठता येणार

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा ‘या’ दिवशी होणार खुला; नागपूर ते नाशिक अंतर ६ तासात गाठता येणार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 22, 2023 06:16 PM IST

Samruddhimahamarg secondphase : मुंबई ते नागपूर या महत्वकांक्षी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे (नागपूर शिर्डी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर आता २६ मे रोजी शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्यापर्यंतचा मार्गखुला होणार आहे.

Samruddhi  mahamarg
Samruddhi  mahamarg

मुंबई ते नागपूर(Mumbai Nagpur expressway) या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi mahamarg) दुसऱ्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.नागपूर ते शिर्डी यापहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होते. आता दुसऱ्या टप्प्यातील नाशिकमधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून येत्या शुक्रवारी (२६ मे) शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर शिर्डी ते भरवीर अंतर अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत पार करता येणार आहे.

मुंबई ते नागपूर या महत्वकांक्षी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे (नागपूर शिर्डी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर आता शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्यापर्यंतचा मार्गखुला होणार आहे. या ट्प्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर नागपूरहून नाशिकपर्यंतचे अंतर केवळ सहा तासात कापता येणार आहे.

२६ मे रोजी शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा ५०१ किमीचा टप्पा सुरू झाला आहे.

शिर्डी ते भरवीर पर्यंतचे ८० किमी महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यात आले आहे. भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे. मुंबई ते भरवीर या उर्वरित २०० किलोमीटरच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे.

 

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग कधी होणार खुला?

शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचे काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात १२ बोगदे आणि १६ छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाईल. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.

WhatsApp channel