मग्रुरीने माफी मागणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांना राज्याबाहेर हाकलून लावा; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात-mumbai mva agitation uddhav thackeray political attacked on pm narendra modi ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मग्रुरीने माफी मागणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांना राज्याबाहेर हाकलून लावा; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात

मग्रुरीने माफी मागणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांना राज्याबाहेर हाकलून लावा; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात

Sep 01, 2024 02:30 PM IST

Maha Vikas Aghadi Protest : मालवण येथील शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महावीकास आघाडीतर्फे सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले होते. यावेळी, उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जहरी टीका केली.

मग्रूरीने माफी मागणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांना राज्याबाहेर हकलवून लावा; उद्धव ठाकरे यांची सरकारवर घणाघाती टीका
मग्रूरीने माफी मागणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांना राज्याबाहेर हकलवून लावा; उद्धव ठाकरे यांची सरकारवर घणाघाती टीका

Maha Vikas Aghadi Protest : मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. आज महाविकास आघाडीतर्फे सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन केले. यावेळी मविआचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शिवरायांची मग्रूरीने माफी मागणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांना हकलवून लावा असे म्हणत पुतळा घाई घाईने उभारण्याची घाई का होती? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

हुतात्मा चौकात पोलिसांचा विरोध झुगारून हे आंदोलन सुरू करण्यात आले. येथील स्मारकाचे दर्शन घेऊन आंदोलन ही गेट वे ऑफ इंडिया समोर जमले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार शाहू महाराज, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यांच्यासह मविआचे मोठे नेते आंदोलनात सहभागी हेल होते.

गेट वे ऑफ इंडिया समोर जमलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली. ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी पहिल्या काही वाक्यांमध्येच महाराजांची आणि सर्व शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली. या पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराजांची आणि शिवप्रेमीची माफी मागितली. त्यांनी माफी नसती मागितली तर महाराष्ट्रने त्यांना शिल्लक ठेवलं नसतं. त्यांनी मगरूरीने माफी मागितली. अशा महाराष्ट्र द्रोह्यांना आता गेट आऊट ऑफ इंडिया करा. त्यांनी केलेल्या चुकीला आता माफी नाही, असे ठाकरे म्हणाले.

पुतळा उभारण्याची घाई का केली ?

उद्धव ठाकरे म्हणाले, नौदल दिनानिमित्त हा पुतळा उभारण्यात आला. ही राज्यासाठी गौरवाची बाब होती. मात्र, हा पुतळा घाई घाईत का उभरण्यात आला. या पुतळ्याच्या उद्घाटणाची घाई का केली? आता तुम्ही माफी कशा कशाची मागणार आहात ? राम मंदिर, महाराज पुतळा अशा अनेक घटना घडल्या. पुतळा कोसळणे ही घटना महाराष्ट्राचा अपमान करणारी आहे. या गोष्टीला कधीच माफी मिळणार नाही, अशा महाराष्ट्र द्रोही सरकारला आता बाहेर करण्याची वेळ आली आहे.